दुर्धर आजाराच्या उपचारासाठी
अर्थसहाय्य योजनेचा लाभ घेण्यासाठी
पात्र दिव्यांगांनी 15 जुलै
पर्यंत अर्ज करावेत
हिंगोली (जिमाका), दि. 19 : हिंगोली जिल्ह्यातील ग्रामीण
भागातील दिव्यांगाना दुर्धर आजाराच्या उपचारासाठी अर्थसहाय्य योजनेसाठी जिल्हा
परिषद समाज कल्याण विभाग यांच्याकडे पंचायत समितीमार्फत अर्ज मागविण्यात येत आहेत.
या योजनेंतर्गत जिल्ह्यातील दुर्धर आजाराने त्रस्त असलेल्या दिव्यांगांना
त्यांच्या आजारावरील उपचारासाठी 25 हजार एवढे अनुदान देण्यात येणार आहे. दुर्धर
आजारामध्ये कॅन्सर, मेंदुविकार, क्षयरोग, हृदय शस्त्रक्रिया, किडनी, यकृत आजार,
कुष्ठरोग, अर्धांगवायू, थॅलासिमिया, सिकलसेल, ॲनामिया, डायबिटीस या आजारांचा
समावेश आहे.
पात्र दिव्यांगांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी पंचायत समितीमार्फत 15 जुलै,
2023 पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी आर. एच. एडके
यांनी केले आहे.
*****
No comments:
Post a Comment