कृषि विज्ञान
केंद्रात राष्ट्रीय बागवानी मंडळाच्या माध्यमातून प्रशिक्षण
हिंगोली (जिमाका), दि. 22 : फलोत्पादन
विकासाला चालना देण्याच्या मुख्य उद्देशाने राष्ट्रीय फलोत्पादन मंडळ, नागपूर,
कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने आयोजित एक दिवसीय
जनजागृती आणि प्रशिक्षण कार्यक्रम दि. 21 जून 2023 रोजी तोंडापूर येथील कृषी
विज्ञान केंद्रात आयोजित करण्यात आला होता.
या
प्रशिक्षणाला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवराज घोरपडे, राष्ट्रीय बागवानी
मंडळाचे नागपूर विभागाचे संचालक डॉ. एस के शर्मा, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ
शास्त्रज्ञ आणि प्रमुख डॉ. पी. पी. शेळके, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक शशिकांत
सावंत, एचडीएफसी बँकेचे बेले उपस्थित होते.
यावेळी
मार्गदर्शन करताना बागवानी मंडळाचे संचालक डॉ. एस. के. शर्मा यांनी प्रशिक्षणाच्या
आयोजनाचा उद्देश स्पष्ट करताना सांगितले की, राष्ट्रीय बागवानी मंडळाचे अनेक
उपक्रम असून त्या उपक्रमामध्ये शेतकऱ्यांना फळबाग लागवड आणि फळबागाच्या विकासासाठी
अनेक योजना देण्यात येत असतात, या योजनांमध्ये भाग घेऊन शेतकरी आपल्या फळबागेचा
विकास चांगल्या प्रकारे करु शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी या राष्ट्रीय बागवानी
मंडळाच्या विविध योजनांमध्ये भाग घेऊन आपल्या शेतीचा विकास करावा, असे सांगितले.
नवीन फळबागा
लावण्यासाठी मंडळाला एकूण प्रकल्प खर्चाच्या 40 टक्के अनुदान कसे मिळू शकते,
ज्याची कमाल रक्कम 30 लाख रुपये प्रती प्रकल्प करु शकतो. त्याचप्रमाणे पॉली हाऊस
आणि शेड नेटच्या आत फळे, फुले व फुले लागवडीसाठी 50 टक्के अनुदान मिळू शकते,
ज्याची कमाल रक्कम प्रत्येक प्रकल्पासाठी 56 लाखांपर्यंत असू शकते आणि शीतगृह
सारखे पीएचएम घटक, पूर्व कुलिंग युनिट. राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाकडून 50.75
लाखांच्या कमाल मर्यादेपर्यंत, पॅक हाऊस इत्यादी उभारण्यासाठी 35 टक्के अनुदान
देखील मिळू शकते. याशिवाय उभारणीसाठी मंडळाकडून 35 टक्के अनुदान देखील घेता येईल.
मोठे शीतगृह ज्यांची क्षमता 5 हजार मेट्रिक टनांपेक्षा जास्त आहे. यासाठी ऑनलाइन
अर्ज प्रक्रिया सुलभीकरणाबाबत सविस्तर माहिती दिली, पहिल्या दोन टप्प्यांसाठी अर्ज
करण्याऐवजी एका टप्प्यात GOC (मंजुरी) कशी घेता येईल, त्यासाठी कोणती कागदपत्रे
आवश्यक आहेत, याबद्दल सविस्तर माहिती डॉ. एस. के. शर्मा यांनी दिली.
याप्रसंगी जिल्हा
अधीक्षक कृषी अधिकारी शिवराज घोरपडे यांनी राष्ट्रीय बागवानी मंडळाच्या योजने
सारखे राज्य शासनाच्या अनेक योजना आहेत. यामध्ये पाच एकरापेक्षा कमी असलेल्या
शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या योजनांच्या संदर्भात त्यांनी
शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांना विविध योजनांची माहिती पत्रके सुद्धा
त्यांनी दिली आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तरे सुद्धा त्यांनी दिली.
आपल्या
प्रास्ताविकात कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. पी. पी. शेळके यांनी राष्ट्रीय
बागवानी मंडळाच्या सोबत आपले विविध अनुभव स्पष्ट केले. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांनी
राष्ट्रीय बागवानी मंडळाला प्रस्ताव सादर करत असताना राष्ट्रीय बागवानी मंडळाच्या
सर्व अटी आणि शर्ती व्यवस्थितपणे समजावून घेऊन त्याप्रमाणे आपला प्रस्ताव सादर
करणे आवश्यक असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे विविध बँका सोबत आपला चांगला समन्वय
ठेवून आपला क्रेडिट स्कोर आणि सिबिल उत्कृष्ट कसा राहील त्या संदर्भातही सातत्याने
शेतकऱ्यांनी प्रयत्न करावे म्हणजे त्यांना राष्ट्रीय बागवानी मंडळासारख्या अनेक
योजनांमध्ये भाग घेता येईल आणि बँकांचे सहकार्य सुद्धा प्राप्त करता येईल, असे सांगितले.
जिल्हा अग्रणी
बँकेचे व्यवस्थापक शशिकांत सावंत यांनी ऑनलाईन पध्दतीने शेतकऱ्यांना मार्गदर्शन
करताना पीक कर्ज वेळेत फेडून त्याचप्रमाणे इतर बँकांचे किंवा बँक समक्ष संस्थांचे
कर्ज परतफेड वेळेवर करुन आपला सिबिल स्कोर उत्तम ठेवावा असे सांगितले. त्यामुळे
शेतकऱ्यांना बँकांचे सहकार्य नियमितपणे आणि चांगल्या प्रकारे मिळू शकेल. त्या
दृष्टीने त्यांनी प्रयत्नरत असावे असे शेतकऱ्यांना आवाहन केले.
शेतकऱ्यांच्या
वतीने नारायण गोरे यांनी त्यांचे फळबाग लागवडीचे विविध अनुभव स्पष्ट केले.
त्याचप्रमाणे त्यांनी राष्ट्रीय बागवानी मंडळाच्या माध्यमातून फार पूर्वी मोठ्या
प्रमाणावर प्रस्ताव सादर करुन त्याद्वारे आपल्या फळबागेचा विकास केल्याची यशोगाथा
सांगितली. कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने उद्यानविद्या तज्ञ अनिल ओळंबे, राष्ट्रीय
बागवानी आयोगाच्या शाहनवाज अहमद, मृदा विज्ञान विषय विशेषज्ञ साईनाथ खरात यांनी
यावेळी मार्गदर्शन केले.
या
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल ओळंबे यांनी केले तर आभार प्रदर्शन राष्ट्रीय
बागवानी मंडळाचे संचालक एस. के. शर्मा यांनी केले. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी
कृषी विज्ञान केंद्राचे सर्व शास्त्रज्ञ राजेश भालेराव, अजय कुमार सुगावे, सौ.रोहिणी
शिंदे, डॉ.कैलाश गीते, शिवलिंग लिंगे, सौ.मनीषा मुंगल, विजय ठाकरे, ओम प्रकाश
गुडेवार, संतोष हनवते, प्रेमदास जाधव यांनी अथक प्रयत्न केले. या कार्यक्रमाला
आबासाहेब कदम, मुजाहेद सिदिकी, धनंजय सूर्यवंशी, गोरखनाथ हाडोळे, निंबाळकर, हाके,
जोगदंड, राहुल कदम तसेच अनेक शेतकरी आणि लोकप्रतिनिधी बहुसंख्येने उपस्थित होते .
*****
No comments:
Post a Comment