हिवताप प्रतिरोध महिना साजरा करण्याचे आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 9 : राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण
कार्यक्रम अंतर्गत हिवताप प्रतिरोध महिना जून-2023 या महिन्यात हिवताप व इतर किटकजन्य आजाराविषयी
(डेंगू, चिकुनगुनिया, जे.ई. चंडीपुरा, हत्तीरोग इत्यादी) जनतेमध्ये जनजागृती निर्माण होऊन त्याचा प्रतिरोध उपाय
योजनाच्या अंमलबजावणीमध्ये सर्वांना सक्रीय सहभागी करुन घेण्याच्या दृष्टीने
दरवर्षी विविध उपक्रमाद्वारे हिवताप प्रतिरोध महिना पारेषण काळापूर्वी म्हणजे जून महिन्यात साजरा करण्यात येतो. या जनजागरण मोहिमेमध्ये गाव
पातळीवर हिवतापाची लक्षणे, उपचार व हिवताप प्रतिरोधाच्या विविध उपाय योजनाची माहिती विविध
माध्यमाद्वारे पोहचविणे आवश्यक आहे. डासोत्पती प्रतिबंध उपाय
योजनामध्ये लोकसहभाग वाढविणे हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे.
यामध्ये पत्रकार परिषद,
खाजगी वैद्यकीय व्यसायिक सभा, जलद ताप रुग्ण सर्व्हेक्षण, डासोत्पत्ती स्थानांत
गप्पीमासे सोडणे, ग्रामीण आरोग्य पोषाहार
व स्वच्छता समितीची सभा, आशा बळकटीकरण,
कन्टेनर सर्व्हेक्षण रांगोळी स्पर्धा, हस्त
पत्रिका वाटप व एक दिवस कोरडा दिवस पाळणे या विषयी
जनतेमध्ये जनजागृती निर्माण करण्यात येते.
जिल्ह्याअंतर्गत सर्व आरोग्य संस्थेचे अधिकारी व कर्मचारी, आशा वर्कर,
ग्रामसेवक, अंगणवाडी ताई, स्थानिक प्रतिष्ठित नागरिक यांचा लोक सहभाग घेऊन गावपातळीवरील
सदरील हिवताप प्रतिरोध महिना साजरा करण्यात यावा, असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी
डॉ. गणेश जोगदंड यांनी केले आहे.
*****
No comments:
Post a Comment