05 June, 2023

 

शासन आपल्या दारी कार्यक्रमांतर्गत सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी

7 जून रोजी जागेवरच निवड संधी मोहिमेचे आयोजन

 

हिंगोली (जिमाका), दि. 05 :  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, हिंगोली यांच्यामार्फत ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमांतर्गत बुधवार, दि. 7 जून, 2023  रोजी हिंगोली जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना रोजगार मिळावा यासाठी जागेवरच निवड संधी ही मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, हिंगोली यांच्या वतीने प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी जागेवरच निवड संधी ही मोहिम चालू करण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील खाजगी संस्था, बँक, कंपन्यामध्ये असलेल्या रिक्त पदासाठी विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेऊन त्यांना कामाची संधी दिली जाते. जास्तीत जास्त उद्योजकांनी आपली रिक्त पदे या कार्यालयास कळवितात. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, एस-3, दुसरा माळा, हिंगोली येथे प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी जागेवरच निवड संधी माहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.

क्रेडिट ऍक्सेस ग्रामीण लि.नागपूर (मायक्रो फायनांस) या कंपनीसाठी पुरुष 19 ते 30 दरम्यान व महिला 19 ते 35 दरम्यान वय असलेले उमेदवारांना ट्रेनी केंद्र मॅनेजर या पदासाठी बारावी, आयटीआय, डिप्लोमा, पदवी शैक्षणिक पात्रता असलेले व स्वत:ची टूव्हीलर आणि लायसन तसेच ई-आधार आवश्यक असलेली मासिक 11 हजार 500 वेतन अधिक प्रोत्साहन भत्ता अधिक पेट्रोल भत्ता अधिक बोनस अधिक राहणे फ्री या तत्वावर हिंगोली-15, परभणी-25, नांदेड- 25 पदे भरण्यात येणार आहेत.

नवकिसान बायोप्लॅन्टेक लिमिटेड, नांदेड या कंपनीसाठी 18 ते 35 वयोगटातील दहावी, बारावी, पदवी शैक्षणिक पात्रतेची फिल्डसेल्स एक्सिकेटीव्ह ची 7 ते 14000 हजार वेतनावर हिंगोली-10, परभणी-10, नांदेड-10 अशी पदे भरण्यात येणार आहेत.

या महिन्याच्या पहिल्या बुधवारी दि. 7 जून, 2023 रोजी सकाळी 11.00 ते दुपारी 2.00 वाजेपर्यंत क्रेडिट ऍक्सेस ग्रामीण लि. (मायक्रो फायनांस) नागपूर व नवकिसान बायोप्लॅन्टेक लिमिटेड नांदेड या आस्थापना/कंपनीचे उद्योजक उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यातील दहावी, बारावी, आयटीआय, पदविका, पदवी व पदवीधर या शैक्षणिक आर्हतेनुसार 90 रिक्तपदे https://rojgar.mahaswayam.gov.inwww.ncs.gov.in या संकेतस्थळावर भेट देवून आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार पदांची खात्री करुन ऑनलाईन नोंदणी करुन स्वत: मूळ कागदपत्रासह जिल्हा विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, एस-3, दुसरा माळा, हिंगोली येथे स्वखर्चाने उपस्थित राहावे. याबाबत काही अडचण आल्यास 7972888970 किंवा 7385924589 या भ्रमणध्वनी  क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त डॉ. राजपाल कोल्हे यांनी केले आहे.

*****

No comments: