08 June, 2023

 

शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या

किनवट शाखा कार्यालयासाठी 27 चे लक्षांक प्राप्त

पात्र लाभार्थ्यांनी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

 

 

            हिंगोली (जिमाका), दि. 08 :  शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्या. नाशिक शाखा कार्यालय किनवट अंतर्गत नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्याचे कार्यक्षेत्र येत आहेत. या कार्यालयामार्फत अनुसूचित जमातीचे सुशिक्षित बेरोजगारांना त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी स्वयंरोजगारासाठी कर्ज स्वरुपात अल्प व्याजदराने एनएसएफटीडीसी नवी दिल्ली पुरस्कृत विविध योजना राबविण्यात येतात.

            एनएसएफटीडीसी नवी दिल्ली पुरस्कृत विविध योजनासाठी नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्याकरिता सन 2023-24 साठी 27 चे लक्षांक प्राप्त आले आहे. यामध्ये दोन लाख रुपये अनुदान असलेल्या महिला सबलीकरण योजनेचे 8 लक्षांक, पाच लाख रुपये अनुदान असलेल्या बचतगट योजनेचे 01 लक्षांक, दोन लाख रुपये अनुदान असलेल्या कृषि आणि संलग्न व्यवसायासाठी 11 लक्षांक, पाच लाख रुपये अनुदान असलेल्या हॉटेल ढाबा व्यवसायासाठी 03, पाच लाख रुपये अनुदान असलेल्या स्पेअर पार्ट/गॅरेज/ऑटो वर्क शॉप साठी 02, दहा लाखापर्यंत अनुदान असलेल्या वाहन व्यवसायासाठी 01 व तीन लाख रुपये अनुदान असलेल्या लघु उद्योग व्यवसायासाठी 01 असे एकूण 27 चे लक्षांक प्राप्त झाले आहे.

            जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांनी शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्यादित नाशिक, शाखा कार्यालय, साईनगर, नागरी दवाखान्याच्या पाठीमागे राकोंडे यांच्या बिल्डींगमध्ये, किनवट ता. किनवट जि. नांदेड येथे संपर्क साधून कर्ज प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन शाखा व्यवस्थापक, शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ म. किनवट यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

****

No comments: