02 June, 2023

 

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य

प्रा. डॉ. गोविंद काळे व प्रा. डॉ. निलीमा सरप (लखाडे) यांचा दौरा

 

हिंगोली (जिमाका), दि. 02 : महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे व प्रा. डॉ. निलीमा सरप (लखाडे)  हे महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या कामकाजासाठी 4 ते 7 जून 2023 या कालावधीत जालना, औरंगाबाद (छ.संभाजीनगर), बीड व उस्मानाबाद (धाराशीव) या जिल्ह्यात विविध जातींच्या संदर्भात क्षेत्र पाहणी करण्यासाठी येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.

रविवार, दि. 4 जून, 2023 रोजी सायं. 4 वा. खाजगी वाहनाने जालना येथील शासकीय विश्रामगृह येथे आगमन व मुक्काम करतील.

सोमवार, दि. 5 जून, 2023 रोजी सकाळी 9 वा. जालना येथून घनसांगवीकडे प्रयाण करतील. सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेपर्यंत घनसांगवी येथील मुस्लिम उंटवाले, वायंदेशी कुणबी या जात समुहाच्या प्रतिनिधींशी चर्चा व क्षेत्र पाहणी  करतील. दुपारी 12 वा. घनसांगवी  येथून परतूर कडे प्रयाण करतील. दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत जालना जिल्ह्यातील परतूर येथील मुस्लिम उंटवाले, वायंदेशी कुणबी  या जात समुहाच्या प्रतिनिधींशी  चर्चा  व क्षेत्रपाहणी करतील. दुपारी 3 वा. जाफराबाद जि.जालना कडे प्रयाण करतील. दुपारी 3 ते 4 वाजेपर्यंत जाफराबाद येथील मुस्लिम उंटवाले, वायंदेशी कुणबी या जात समुहाच्या प्रतिनिधींशी चर्चा व क्षेत्र पाहणी करतील. सायं. 4 वा. औरंगाबाद (छ.संभाजीनगर) कडे प्रयाण करतील. सायं. 5 वा. औरंगाबाद (छ.संभाजीनगर) शासकीय विश्रामगृह येथे आगमन व औरंगाबाद (छ.संभाजीनगर) मुस्लिम उंटवाले, वायंदेशी कुणबी या जात समुहाच्या प्रतिनिधींशी चर्चा व क्षेत्र पाहणी करतील. सायं. 7 वा. बीड कडे प्रयाण करतील. रात्री 9 वा. शासकीय विश्रामगृह बीड येथे आगमन व मुक्काम.

मंगळवार, दि. 6 जून, 2023 रोजी सकाळी 10 ते 10.30 वाजेपर्यंत सहायक आयुक्त समाज कल्याण बीड यांचा इतर मागास बहुजन कल्याण योजनांचा आढावा व सदस्य सचिव, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती बीड यांच्या समवेत  चर्चा. सकाळी 10.30 वा. बीड येथून आष्टी तालुक्यातील मुर्शदापूरकडे प्रयाण करतील. सकाळी 10.30 ते दुपारी 12 वाजेपर्यंत मुर्शदापूर येथील मुस्लिम उंटवाले, तांबटगर (कलईगर) या जात समुहाच्या प्रतिनिधींशी चर्चा व क्षेत्र पाहणी  करतील. दुपारी  12 वा. मुर्शदापूर येथून माजलगाव कडे  प्रयाण  करतील. दुपारी 2 ते 3.30 वाजेपर्यंत माजलगाव मधील शिळसाळा येथील मुस्लिम उंटवाले, तांबटगर (कलईगर) या जात समुहाच्या प्रतिनिधींशी चर्चा व क्षेत्र पाहणी करतील. दुपारी 3.30 वा. माजलगाव येथून केज कडे प्रयाण करतील. सायं. 4.30 ते 5.30 वाजेपर्यंत केज येथील मुस्लिम उंटवाले, तांबटगर (कलईगर) या जात समुहाच्या प्रतिनिधींशी चर्चा व क्षेत्र पाहणी करतील. सायं. 5.30 वा. उस्मानाबाद  (धाराशिव)  कडे  प्रयाण  करतील. सायं. 7 वा. उस्मानाबाद (धाराशीव) येथे आगमन व शासकीय विश्रामगृह येथे मुक्काम करतील.

बुधवार, दि. 7 जून, 2023 रोजी  सकाळी  10 ते 10.30 वाजेपर्यंत सहायक आयुक्त समाज कल्याण उस्मानाबाद  यांचा  इतर मागास  बहुजन कल्याण योजनांचा आढावा व सदस्य सचिव जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती उस्मानाबाद यांच्यासमवेत चर्चा. सकाळी 10.30 वा. उस्मानाबाद येथून इंदापूर जि.उस्मानाबाद कडे प्रयाण करतील. सकाळी  11.30 ते  दुपारी  12.30 वाजेपर्यंत  इंदापूर येथील तांबटगर (कलईगर)  या जात समुहाच्या प्रतिनिधींशी चर्चा व क्षेत्र पाहणी  करतील. दुपारी 12.30  वा. उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशीकडे प्रयाण करतील. दुपारी  1 ते 1.30 वाजेपर्यंत वाशी येथील तांबटगर (कलईगर) या जात समुहाच्या प्रतिनिधींशी चर्चा व क्षेत्र पाहणी करतील. दुपारी  1.30 वा. कळंबकडे  प्रयाण  करतील. दुपारी  2.30  ते  3.30 वाजेपर्यंत कळंब येथील तांबटगर (कलईगर) या जात समुहाच्या प्रतिनिधींशी चर्चा व क्षेत्र पाहणी करतील. दुपारी 3.30 वा. तुळजापूरकडे प्रयाण करतील. सायं. 4.30 ते 5.30 वाजेपर्यंत श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान अंतर्गत, अभियांत्रिकी महाविद्यालय व सैनिकी विद्यालयांमधील शिक्षक व शिक्षकेत्तर रिक्त पदांचा आढावा घेतील व त्यानंतर सायंकाळी  6 वा. पुण्याकडे प्रयाण करतील.

*****

No comments: