साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे
शिष्यवृत्तीसाठी
15 जुलै पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
हिंगोली
(जिमाका), दि. 23 : दहावी, बारावी, पदवी, पदव्युत्तर, वैद्यकीय व अभियांत्रिकी इत्यादी
अभ्यासक्रमामध्ये सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात सरासरी 60 टक्के किंवा त्यापेक्षा
जास्त गुण प्राप्त घेऊन उत्तीर्ण झालेल्या
मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील विद्यार्थ्यांना महामंडळाकडून ज्येष्ठता व जास्त
गुण क्रमांकानुसार जिल्ह्यातील प्रथम 3 ते 5 विद्यार्थ्यास उपलब्ध निधीच्या अधीन
राहून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठी शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येते.
हिंगोली
जिल्ह्यातील मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील विद्यार्थ्यांनी गुणपत्रक, शाळा
सोडल्याचा दाखला, रेशन कार्ड, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, आधारकार्ड, दोन
फोटो, पुढच्या वर्गात प्रवेश घेतल्याची पावती किंवा बोनाफाईड सर्टिफिकेटसह जिल्हा
व्यवस्थापकांच्या नावे शिष्यवृत्ती मागणीचा अर्ज भरुन कागदपत्रासह साहित्यरत्न
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्या.हिंगाली, डॉ.बाबासाहेब आंबेडकर
सामाजिक न्याय भवन, रिसाला बाजार, सरकारी दवाखान्याजवळ, हिंगोली-431513 (मो. क्र.
9309151060, 9822628469) येथे दि. 15 जुलै, 2023 पर्यंत कार्यालयीन वेळेत संपर्क
साधावा. तसेच उशिरा आलेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत याची नोंद घ्यावी, असे
आवाहन जिल्हा व्यवस्थापक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ
मर्या. हिंगोली यांनी केले आहे.
****
No comments:
Post a Comment