02 June, 2023

 

धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल शाळांनी

पायाभूत सोयीसुविधाच्या अनुदानासाठी 30 जून पर्यंत प्रस्ताव सादर करावेत

 

हिंगोली (जिमाका), दि. 02 : जिल्ह्यातील धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल शासनमान्य खाजगी अनुदानित, विना अनुदानित, कायम विना अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगर परिषद शाळा व अपंग शाळांमध्ये पायाभूत सोयी सुविधा पुरविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक विभागाच्या दि. 31 मे, 2023 च्या शासन निर्णयान्वये सन 2023-24 साठी अनुदान योजना राबविण्यात येत आहे.

या योजनेंतर्गत धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल शासनमान्य खाजगी अनुदानित, विना अनुदानित, कायम विना अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगर परिषद शाळा व अपंग शाळांमध्ये पायाभूत सोयी सुविधा पुरविण्यासाठी सन 2023-24 च्या अनुदानासाठी इच्छूक शाळांकडून दि. 7 ऑक्टोबर, 2015 च्या शासन निर्णयामध्ये नमूद केलेल्या विहित नमुन्यातील परिपूर्ण अर्ज परिशिष्ट अ प्रमाणे, शाळेचे संपूर्ण नाव, आवश्यक कागदपत्रे टंकलिखित करुन सवस्तिर प्रस्ताव जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे दि. 30 जून, 2023 पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावेत. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात प्राप्त होणारे प्रस्ताव विचारात घेतले जाणार नाहीत, असे जिल्हा नियोजन अधिकारी, हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

*****

No comments: