14 June, 2023

 

केंद्रीय भूजल बोर्डाच्या वतीने हिंगोली जिल्ह्याचा भूजल व्यवस्थापन आराखडा

जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याकडे सुपूर्द

          

 


            हिंगोली (जिमाका), दि. 14 : केंद्रीय भूजल बोर्ड, मध्य क्षेत्र, नागपूरचे वैज्ञानिक श्रीमती  निलोफर व आश्विन आटे यांनी आज दि. 14 जून रोजी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांची भेट घेऊन हिंगोली जिल्ह्याचा भूजल व्यवस्थापन आराखडा सादर केला.

             या आराखड्यामध्ये हिंगोली जिल्ह्यात पाण्याची भूजल पातळी, भूजलाचे व्यवस्थापन, सद्यस्थितीत हिंगोली जिल्ह्यातील पाण्याची उपलब्धता, पाण्याची गुणवत्ता, आणि कोणत्या क्षेत्रात पाण्याची आवश्यकता आहे, याबाबत सखोल चर्चा करण्यात आली.

            यावेळी जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी उपस्थित कृषि अधिकारी तसेच इतर अधिकाऱ्यांना माहिती देऊन अंमलबजावणी करण्यास सांगितले. हा आराखडा अत्यंत महत्वाचा असून याचा भविष्यात उपयोग करता येईल, असेही जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी सांगितले.  

*****

No comments: