जिल्हा वार्षिक योजनेची प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण
करावीत
-
जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर
हिंगोली
(जिमाका), दि. 16 : जिल्ह्यातील सर्व कार्यालय प्रमुखांनी जिल्हा वार्षिक
योजनेअंतर्गतची प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी
जितेंद्र पापळकर यांनी आज दिले.
येथील
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या
अध्यक्षतेखाली जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव केंद्रे, अपर जिल्हाधिकारी
खुशालसिंह परदेशी, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी
गणेश वाघ, आत्माराम बोंद्रे यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी
जितेंद्र पापळकर यांनी आज सर्व कार्यालय प्रमुखांची बैठक घेऊन जिल्हा वार्षिक
योजनेअंतर्गत सन 2022-2023 साठी वितरीत केलेल्या निधीतील प्रलंबित कामे तात्काळ
पूर्ण करोवत. तसेच केलेल्या कामाचा ताळमेळाचे काम तात्काळ पूर्ण करुन उपयोगिता
प्रमाणपत्रासह अहवाल सादर करावा. सर्व यंत्रणांनी सन 2023-24 मध्ये त्यांना मंजूर
केलेली तरतूद, उपलब्ध निधी याचे योग्य नियोजन करुन प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव
तात्काळ सादर करावेत. एकमेकाशी समन्वय ठेवून निधी खर्च करण्याबाबत कार्यवाही करावी
व त्याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी
केल्या.
तसेच हिंगोली जिल्ह्यातील सामाजिक-आर्थिक परिस्थिती, नैसर्गिक संसाधनामधील
असमानता आणि जलद शहरीकरणाच्या आव्हानांना सामोरे जाण्याची गरज या सर्व बाबी
विचारात घेऊन हिंगोली जिल्ह्यासाठी ‘जिल्हा विकास आराखडा’ तयार करण्यात येणार आहे. जिल्हा विकास आराखडा तयार करण्यासाठी आपल्या विभागाची
माहिती तात्काळ सादर करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी यावेळी
दिल्या.
या बैठकीत
आरोग्य विभाग, महावितरण विभाग, शालेय शिक्षण विभाग, जलसंधारण, पाणीपुरवठा, कृषी,
बांधकाम यासह विविध विभागाचा आढावा घेतला.
****
No comments:
Post a Comment