बोराळा येथील जिल्हा परिषद शाळेसाठी
डॉ.दिलीप
बोराळकर यांनी दिली 18 हजार चौरस फूट जागा दान
- मुख्य कार्यकारी
अधिकारी संजय दैने यांनी केले डॉ. बोराळकर यांचे अभिनंदन
हिंगोली
(जिमाका), दि. 10 : हिंगोली तालुक्यातील बोराळा येथे जिल्हा परिषदेची
इयत्ता पहिली ते पाचवीचे वर्ग असलेली शाळा आहे. या गावाची लोकसंख्या 1500 असून
गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये 125 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. बोराळा
गावचे भूमिपूत्र डॉ.दिलीप भास्करराव बोराळकर यांनी आज 18 हजार चौ.फूट जागा
गावातीलच जिल्हा परिषद शाळेला विनामूल्य नोंदणीकृत दान दिली आहे.
दान दिलेल्या
जागेची दस्त नोंदणी बोराळा जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकाच्या नावे करुन
दिलेली आहे. ही बाब आजच्या काळात समाजातील दानशूर लोकांसाठी राजमार्ग करुन देणारी
आहे. हिंगोली जिल्ह्यातील दानशूर
व्यक्तींनी डॉ.दिलीप बोराळकर यांचा आदर्श घ्यावा अशी घटना आहे. या जागेचे दस्त
नोंदणी करुन समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे. या कार्याची दखल घेऊन जिल्हा
परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांनी डॉ.दिलीप बोराळकर यांचा यथोचित
सन्मान केला व आपण समाजापुढे आदर्श
निर्माण केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
डॉ. दिलीप
भास्कराव बोराळकर हे मुंबई महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळामध्ये सचिव म्हणून
सेवा केलेली आहे. भारत सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाच्या विविध विभागामध्ये सुध्दा
त्यांनी सेवा केलेली आहे. डॉ.बोराळकर हे मौजे बोराळा गावाचे भूमिपूत्र असून
त्यांच्या परिवारातील कुटुंबियांचे शिक्षण गावातील जिल्हा परिषद शाळेत झालेले आहे.
गावाचे व शाळेचे आपल्यावर संस्कार असल्याने आपण शाळेसाठी काही तरी केले पाहिजे या
भावनेतून त्यांच्या मालकीची 18 हजार चौ.फूट जागा जिल्हा परिषद शाळेला दान दिली
आहे.
यावेळी अतिरिक्त
मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प
संचालक नामदेव केंद्रे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अनंतकुमार कुंभार,
शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के, माधवराव सलगर, जिल्हा पाणी पुरवठा अधिकारी
वाटेगावकर, मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे स्वीय सहायक बोथीकर, बोराळा गावाचे
सरपंच कावेरीबाई बद्रीनाथ इसाये, उपसरपंच गोकर्णा मधुकर इसाये, शालेय व्यवस्थापन
समितीचे अध्यक्ष देविदासराव वाबळे, उपाध्यक्षा अर्चना गायकवाड, सदस्य गंगाराम
इसाये, सेवा सोसायटीचे चेअरमन शिवाजीराव वाबळे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष अशोक
घंगाळे, बद्रीनाथ किशन इसाये, मधुकर पंडित इयाये व इतर गावातील नागरिक उपस्थित
होते. शाळेचे मुख्याध्यापक संतोष पवार, शिक्षक विनोद चव्हाण, सखाराम सातपुते,
फकीरा गायकवाड, रमेश जगताप, विलास सदावर्ते, संतोष बांगर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment