15 May, 2023

 

जादूटोणाविरोधी कायदा जनजागृती प्रचार व प्रसार कार्यक्रम जिल्हास्तरीय समितीवर

अशासकीय व जिल्हा समन्वयक सदस्य नियुक्तीसाठी 18 मेपर्यंत प्रस्ताव सादर करावेत

 

हिंगोली (जिमाका),दि. 15 : भारतीय समाजात रुजलेल्या काही अनिष्ट, अघोरी, अमानुष संस्कारातून रुजलेल्या अनेक प्रकारच्या गैरसमजुतीमुळे समाजाचे नुकसान होत असल्याने व त्यांचे होणारे शोषण व छळ थांबविण्यासाठी शासनाने दि. 20 डिसेंबर, 2013 रोजी महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा प्रतिबंध अधिनियम-2013 जारी करण्यात आलेला आहे.

जादुटोणाविरोधी कायदा जनजागृती प्रचार व प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी जिल्हास्तरीय समितीवर जादुटोणाविरोधी व अंधश्रध्दा निर्मूलनासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींची अशासकीय व जिल्हा समन्वयक सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे.

त्या अनुषंगाने जादुटोणा व अंधश्रध्दा निर्मूलन या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या इच्छूक व्यक्तींनी दि. 18 मे, 2023 पर्यंत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली येथे प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन शिवानंद मिनगीरे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली यांनी केले आहे.

****

No comments: