यु.पी.एस.सी. नागरी
सेवा परीक्षेत महाज्योतीने अर्थसहाय्य दिलेल्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश !
एकूण अकरा विद्यार्थ्यांना
नागरी प्रशासकीय सेवेची संधी
हिंगोली (जिमाका), दि. 24 : महाराष्ट्र
शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त संस्था असलेल्या महात्मा ज्योतिबा
फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती),नागपूर या संस्थेमार्फत इतर मागास वर्ग,
विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना यु.पी. एस.सी
नागरी सेवा परीक्षेच्या व्यक्तिमत्व चाचणी परीक्षेकरिता रु.25,000/- प्रत्येकी अर्थसहाय्य
करण्याची योजना राबविण्यात येते.
महाज्योतीने सन
2022-23 या आर्थिक वर्षात इतर मागास वर्ग,
विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना यु.पी.एस.सी.
नागरी सेवा परीक्षेच्या व्यक्तिमत्व चाचणी परीक्षेकरिता रु.25,000/- प्रत्येकी अर्थसहाय्य
करण्याची योजना सुरु केली होती. या योजनेचा लाभ घेण्यासाठी दि.14/12/2022 रोजी जाहिरात
प्रसिद्ध करण्यात आलेली होती, त्याकरिता एकूण 47 उमेदवारांनी अर्ज केलेले होते. त्यापैकी
योजनेकरिता पात्र 44 विद्यार्थ्यांना यु.पी.एस.सी नागरी परीक्षेच्या तयारी करिता प्रत्येकी
रु.25,000/- इतके अर्थसहाय्य देण्यात आलेले होते.
केंद्रीय लोकसेवा आयोगाने
घेतलेल्या नागरी सेवा परीक्षा 2022 चा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. त्यात महाज्योतीने
अर्थसहाय्य दिलेल्या 44 विद्यार्थ्यांपैकी 11 विद्यार्थ्यांना यश मिळाले आहे. त्यातील
4 विद्यार्थी इतर मागास वर्ग, 3 विद्यार्थी विमुक्त जाती, भटक्या जमाती-ड मधील 3 विद्यार्थ्यांना
यश मिळाले आहे तसेच विशेष मागास प्रवर्गातील 1 उमेदवाराला देखील अंतिम परीक्षेत यश मिळाले आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांमधे
अभिषेक दुधाळ, ओंकार गुंडगे, पल्लवी सांगळे, शुभाली परिहार, शुभांगी केतन, श्रृती कोकटे,
रोशन कच्छाव, अनुराग घुगे, सागर देठे, अनिकेत पाटील, आदित्य पाटील समावेश आहे.
मा.ना.श्री. अतुल सावे
मंत्री, इतर मागास बहुजन कल्याण, सरकार तथा अध्यक्ष महाज्योती, नागपूर यांनी सर्व उत्तीर्ण
विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच महाज्योती तर्फे राबविण्यात येणाऱ्या यु.पी.एस.सी.
नागरी सेवा व्यक्तिमत्व चाचणी परीक्षेसाठी आर्थिक सहाय्य योजनेचा अधिकाधिक विद्यार्थ्यांनी
लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे. मा. श्री राजेश खवले व्यवस्थापकीय संचालक महाज्योती,
नागपूर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या
आहेत.
____________
यु.पी.एस. सी अर्थसाहाय्य योजनेचा लाभ घेतलेल्या
विद्यार्थ्यांचे मनोगत
शाळेत असतांना पासून
माझे प्रशासकीय अधिकारी बनण्याचे स्वप्न होते. अडचणी होत्या आर्थिक तडजोडी होत्या.
तरी फोकस सुटू दिला नाही. युपीएससी मेन्स पास झाले. आता मुलाखतीचे दिव्य पार करावे
लागणार होते आणि त्याकरिता दिल्लीत जाऊन एक आठवडा राहायचे होते. मुलाखत पास करायचे
सोबत दिल्लीत राहण्या, खाण्याचे टेंशन होते. त्यावेळी महाज्योतीतर्फे आर्थिक सहाय्य
योजनेची खुप मदत झाली. आर्थिक सुरक्षिततेने बळ वाढवले निश्चिंत मनाने मुलाखत देता आली.
मला अभिमान वाटते की आर्थिक विवंचनेत अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगणार्या मागास प्रवर्गातील
विद्यार्थांना महाज्योतीची मदत आहे.
शुभाली परिहार
मी इंजिनियरींग करत असतांना
युपीएससी साठी प्रयत्न सुरु केले. नागरी अधिकारी बनण्याचे स्वप्न मला स्वस्थ बसू देत
नव्हते. अखेर चौथ्या प्रयत्नात पास झाले. यूपीएससी मध्ये यूपीएससी पूर्व परीक्षा, यूपीएससी
मुख्य परीक्षा, यूपीएससी मुलाखत या टप्प्यातून जावे लागते. उमेदवाराला या तीनही पायऱ्या
पूर्ण कराव्या लागतात. उमेदवार जर कोणत्याही परीक्षेमध्ये नापास झाला तर त्याला परत
पहिल्यापासून म्हणजे पूर्व परिक्षेपासून प्रयत्न सुरू करावे लागते. यासर्वात वेळेबरोबरच
जवळचा पैसाही खर्च होतो. माझ्यासारख्या विद्यार्थ्याना अभ्यासावर संपुर्ण फोकस करता
येत नाही. सारखी पैश्याची काळजी लागून राहिलेली असते. त्यामुळे अपेक्षित निकाल लागत
नाही. यावेळी महाज्योतीच्या अर्थसाहाय्य योजनेची खुप मदत झाली. महाज्योती अश्या योजनांच्या
माध्यमातून माझ्यासारख्या असंख्य मुलास प्रशिक्षण देऊन, अर्थ सहाय्य करुन स्वत:च्या
पायावर उभे राहण्यास आत्मनिर्भर बनविण्याचे मोठे काम करीत आहे.
रोशन कच्छाव
****
No comments:
Post a Comment