23 May, 2023

 

‘‘शासन आपल्या दारी’’ अभियानांतर्गत देण्यात येणाऱ्या लाभाची माहिती

मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाला तात्काळ सादर करण्याचे निर्देश

- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

 


हिंगोली (जिमाका), दि. 23 : जिल्ह्यात विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी " शासन आपल्या दारी " अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत संबंधित विभागाने योजनेचे नाव, निश्चित केलेले लाभार्थी, लाभार्थ्यांना मिळणारे अनुदान याची माहिती मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाला तात्काळ सादर करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिलेआहेत.

             जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज जिल्ह्यातील सर्व कार्यालय प्रमुखांची "शासन आपल्या दारी " या अभियानाचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी जिल्हाधिकारी श्री. पापळकर बोलत होते. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर जाधव, विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

"शासन आपल्या दारी " या विशेष कार्यक्रमासाठी जिल्हा प्रशासनातील सर्व विभाग सहभागी होणार असून यात अनेक नावीन्यपूर्ण गोष्टी करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना विभागनिहाय लाभाचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले आहे. त्यानुसार संबंधित अधिकाऱ्यांनी नियोजन करुन ‘शासन आपल्या दारी’ या विशेष उपक्रमांतर्गत जास्तीत जास्त लाभार्थ्यांना लाभ देण्यात यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी या बैठकीत दिले.

****

No comments: