26 May, 2023

 

इमाव महामंडळातील कर्जाची एकरकमी परतफेड करणाऱ्यांना

थकीत व्याजात 50 टक्के सवलत

                                                                                                             

            हिंगोली (जिमाका), दि.26 : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या संपूर्ण थकीत कर्जाचा एक रकमी भरणा करणाऱ्या लाभार्थ्यास थकीत व्याज रक्कमेत 50 टक्के सवलत देण्याबाबतची सुधारित एकरकमी योजना दि. 31 मार्च, 2024 पर्यंत लागू केली आहे.

हिंगोली जिल्ह्यातील थकबाकीदार लाभार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे जिल्हा कार्यालय, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, रिसाला बाजार, हिंगोली-413513 (दूरध्वनी 02456-224465) येथे संपर्क साधून या योजनेचा फायदा घेऊन कर्ज मुक्त व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एस.एन.झुंजारे यांनी केले आहे. 

*****

No comments: