गाळमुक्त धरण व गाळ युक्त शिवार योजनेतून जलसाठ्यातील गाळ
काढण्यासाठी
अशासकीय संस्थाची निवड करण्यासाठी प्रस्ताव सादर करावेत
हिंगोली (जिमाका), दि. 10 : राज्य
शासनाच्या वतीने गाळमुक्त धरण व गाळ युक्त शिवार योजना राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने गाळ काढणे व तो शेतामध्ये वापरणे
यासाठी जलसाठ्यातील गाळ काढून तो शेतात पसरविण्यात येत आहे. योजनेंतर्गत
जलसाठ्यामधून गाळ काढण्याची अंमलबजावणी ही अशासकीय संस्थेमार्फत करण्यात येणार
आहे. या कामासाठी इच्छुक अशासकीय संस्थेने जिल्हा जलसंधारण अधिकारी, मृद व
जलसंधारण विभाग, हिंगोली या कार्यालयास दि. 16 मे, 2023 रोजी दुपारी 12.00 पर्यंत
आपले प्रस्ताव सर्व कागदपत्रासह (प्रमाणपत्रासोबत) सादर करावे.
या कामासाठी दि. 4 मे, 2023 च्या शासन परिपत्रकातील खालील निकषानुसार
अशासकीय संस्थाची निवड करण्यात येणार आहे.
अशासकीय संस्थेने नोंदणी प्रमाणपत्रासह त्यांचे तीन वर्षाचे ऑडिट
केलेली कागदपत्रे अद्यावत असावीत. गाळ काढण्यासाठी घेतलेल्या कामांचा संख्येच्या
प्रमाणात जिल्हा, तालुका, ग्रामपंचायत व जलसाठा पातळीवर स्मार्ट फोन डेटा प्रविष्ट
करण्यास सक्षम असणारे पुरेसे कर्मचारी वर्ग नेमणूक करण्यात अशासकीय संस्था सक्षम
असावी. अशासकीय संस्थेकडे यापूर्वी गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार, जलसाठे, ग्रामीण
विकास, जलसंधारण अंतर्गत यशस्वीरित्या कामे करण्याचा अनुभव असणे आवश्यक आहे.
अशासकीय संस्थेकडे सनियंत्रण आणि मूल्यांकनावर काम करण्यास अनुभव असावा. सर्व
अधिकारी जिल्हा जलसंधारण अधिकारी कार्यालयाकडे राखीव राहतील.
उर्वरित सर्व माहिती मृद व जलसंधारण विभागाच्या दि. 20 एप्रिल, 2023
रोजी शासन निर्णयामध्ये नमूद आहेत. अधिक माहितीसाठी सहायक अभियंता श्रेणी-2 व्ही.
व्ही. चव्हाण यांच्याशी भ्रमणध्वनी क्र.9075897874 वर संपर्क साधावा, असे आवाहन
सदस्य सचिव, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार तथा जिल्हा जलसंधारण अधिकारी, मृद व
जलसंधारण विभाग, हिंगोली यांनी केले आहे.
*****
No comments:
Post a Comment