19 May, 2023

 

एचसीएल टेक-बी या उपक्रमांतर्गत आयटी जॉब ओरिएंटेड प्रोग्रामवर

मार्गदर्शन व नोंदणी शिबिरास उपस्थित राहण्याचे आवाहन

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 19 : माध्यमिक शिक्षण विभागाकडील सर्व खाजगी व सरकारी माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील सन 2022-2023 यावर्षी  इयत्ता 12 वी मधील गणित विषयासह परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यासाठी  एचसीएल टेक-बी या उपक्रमांतर्गत आयटी जॉब ओरिएंटेड प्रोग्रामवर मार्गदर्शन व नोंदणी (रजिस्ट्रेशन) करण्यासाठी दि. 23 मे, 2023 रोजी सकाळी 10.30 वाजता सरजूदेवी भिकुलाल भारुका आर्य कन्या विद्यालय, हिंगोली येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी या शिबिरास इयत्ता 12 वी मधील गणित विषयासह परिक्षा दिलेले आपल्या शाळेतील दोन विद्यार्थी, पालक व एक शिक्षक उपस्थित राहण्यास सांगावेत. ही नोंदणी (रजिस्ट्रेशन) निशुल्क असून यासाठी विद्यार्थ्यांनी 10 वी व 11 वीचे गुणपत्रक व आधारकार्डची  झेरॉक्स प्रत आणणे बंधनकारक आहे. अधिक माहितीसाठी श्री. सुरज तायडे (मो. क्र. 9370064979) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन माधव सलगर, शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद, हिंगोली यांनी केले आहे.

*****  

No comments: