17 May, 2023

 अनुदान व बीजभांडवल योजनेचा लाभ  घेण्यासाठी  

कर्जाचे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

 

हिंगोली (जिमाका), दि. 17 : येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ कार्यालयाच्या वतीने मातंग समाज व 12 पोटजातीना अनुदान योजना व बीजभांडवल योजनेचा बँकेमार्फत लाभ देण्यासाठी सन 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये अनुदान योजनेचे व बिजभांडवल योजनेचे उदिष्टे प्राप्त झालेले आहेत. वरील दोन्ही योजनेच्या कर्जाचा लाभ घेण्यासाठी वयोमर्यादा 18 ते 50 च्या आत असणे आवश्यक आहे.

वरील दोन्ही योजनेचा लाभ  घेण्यासाठी  गरजू लाभार्थ्याने जातीचा दाखला, उत्पनाचे प्रमाणपत्र, फोटो 2 प्रती, रेशन कार्ड, आधार कार्ड, 6) व्यवसाय ज्या ठिकाणी  करावयाचा आहे त्या जागेचा पुरावा, व्यवसायाचे कोटेशन, अनुभव प्रमाणपत्र, शासकीय  योजनेचा  लाभ  न घेतलेले प्रमाणपत्र व शौचालय बांधल्याचे ग्रामसेवक  यांचे प्रमाणपत्र, प्रकल्प अहवाल, निवडणुक ओळखपत्र,  दुकानाचा परवाना, लायसन्स, बॅच,परमीट  इत्यादी  कागदपत्रे घेऊन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ जिल्हा कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, रिसाला बाजार, शासकीय दवाखान्याजवळ, हिंगोली  येथे संपर्क साधून कर्ज प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, हिंगोली केले आहे.

अनुदान योजनेसाठी  प्रकल्प मर्यादा 50 हजार रुपयापर्यंत गुंतवणूक असणाऱ्या  रक्कमेमध्ये  10 हजार अनुदान व उर्वरित बँकेचे कर्ज या स्वरुपात राहील.

बीजभांडवल योजनेसाठी  प्रकल्प मर्यादा 50001 रुपये ते 7 लाख रुपयापर्यत  यामध्ये लाभार्थ्यांचा सहभाग 5 टक्के, महामंडळाचे कर्ज 20 टक्के (10 हजार रुपये अनुदानासह)  व बँकेचे कर्ज  75 टक्के या योजनेत स्थिर भागभांडवल  निर्मितीच्या उद्योगाचे कर्ज  प्रस्तावाचा समावेश असणार आहे. यामध्ये  वाहन, यंत्रे, मशिनरी खरेदी  तसेच इतर विविध व्यवसायासाठी उदिष्टे देण्यात आलेली आहेत.

***** 

No comments: