सुशिक्षित बेरोजगार उमेदवारासाठी 08 नोव्हेंबर रोजी
जागेवरच निवड संधी मोहिमेचे आयोजन
हिंगोली
(जिमाका), दि. 06 : जिल्हा कौशल्य विकास,
रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, हिंगोली यांच्यामार्फत बुधवार,दि. 08
नोव्हेंबर, 2023 रोजी हिंगोली जिल्ह्यातील
सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना रोजगार मिळावा यासाठी जागेवरच निवड संधी मोहिमेचे
आयोजन करण्यात आले आहे.
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, हिंगोली
यांच्या वतीने जिल्ह्यातील सुशिक्षित
बेरोजगार युवक-युवतींना रोजगार मिळावा यासाठी जागेवरच निवड संधी ही मोहिम चालू
करण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील खाजगी संस्था, बँक, कंपन्यामध्ये असलेल्या रिक्त
पदासाठी विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेऊन त्यांना कामाची संधी दिली जाते. जास्तीत
जास्त उद्योजकांनी आपली रिक्त पदे या कार्यालयास कळवितात. त्यामुळे जास्तीत जास्त
विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व
उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, एस-3, दुसरा माळा,
हिंगोली येथे प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी जागेवरच निवड संधी माहिमेचे
आयोजन करण्यात येत आहे.
भारत फायनान्स हिंगोली या कंपनीमध्ये
फिल्ड ऑफिसरची बारावी, आयटीआय, डिप्लोमा, पदवी, पदवीधर या शैक्षणिक पात्रतेची 50 पदे
भरावयाची आहेत. यासाठी स्वत:ची टुव्हिलर आणि लायसन आवश्यक आहे. वयोमर्यादा 18 ते 28
वर्षे आहे. या पदासाठी 13 हजार 500 रुपये वेतन अधिक प्रोत्साहन भत्ता अधिक पेट्रोल
भत्ता, वार्षिक बोनस मिळणार आहे.
क्रेडिट ऍक्सेस ग्रामीण लि. नागपूर
(मायक्रो फायनान्स) कंपनीमध्ये ट्रेनी केंद्र मॅनेजरची बारावी, आयटीआय, डिप्लोमा, पदवी,
पदवीधर शैक्षणिक पात्रतेची हिंगोली, परभणी, नांदेडची एकूण 20 जागा पुरुष 19 ते 30 व
महिला 19 ते 35 वयोगटातील उमेदवारामधून भरावयाची आहेत. यासाठी स्वत:ची टुव्हीलर आणि
लायसन, ई-आधार आवश्यक आहे. या पदासाठी 11 हजार 500 मासिक प्रोत्साहन भत्ता अधिक पेट्रोल
भत्ता अधिक वार्षिक बोनस अधिक राहणे फ्री आहे.
या महिन्याच्या बुधवार दि. 08 नोव्हेंबर, 2023
रोजी सकाळी 11.00 ते दुपारी 2.00 वाजेपर्यंत भारत फायनान्स हिंगोली, क्रेडिट ऍक्सेस ग्रामीण लि. नागपूर या आस्थापना/कंपनीचे उद्योजक
उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यातील दहावी, बारावी, आयटीआय, पदविका, पदवी व पदवीधर
या शैक्षणिक आर्हतेनुसार 70 पेक्षा अधिक रिक्तपदे https://rojgar.mahaswayam.gov.in व www.ncs.gov.in या
संकेतस्थळावर अधिसूचित केली असून आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार पदांची खात्री करुन
ऑनलाईन अर्ज करुन स्वत: मूळ कागदपत्रासह जिल्हा विकास रोजगार व उद्योजकता
मार्गदर्शन केंद्र, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, एस-3, दुसरा माळा, हिंगोली येथे
स्वखर्चाने उपस्थित राहावे. याबाबत काही अडचण आल्यास 7972888970 किंवा 7385924589
या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा,
असे आवाहन सहायक आयुक्त डॉ. राजपाल कोल्हे यांनी केले आहे.
*****
No comments:
Post a Comment