शासकीय ग्रंथालयात दिवाळी अंक प्रदर्शनाचे
उद्घाटन
हिंगोली (जिमाका), दि. 30 : येथील
जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात आयोजित दिवाळी अंक प्रदर्शनाचे आज
उपजिल्हाधिकारी स्वप्नील मोरे यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले.
यावेळी मराठवाडा विभाग
ग्रंथालय संघाचे कार्याध्यक्ष खंडेराव सरनाईक, मराठवाडा साहित्य परिषदेचे अशोक
अर्धापूरकर, आदर्श महाविद्यालयाचे प्रा. रमेश दळवी, जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष
ढोक, मिलिंद सोनकांबळे, शंभूनाथ दुभळकर, ग्रंथालय पदाधिकारी व विद्यार्थी यांची प्रमुख
उपस्थिती होती.
या उद्घाटन कार्यक्रमानंतर
जिल्हा ग्रंथ निवड समितीची बैठकीत सन 2023-24 या वर्षासाठी जिल्हा ग्रंथालयासाठी सर्व
समावेशक व दर्जेदार ग्रंथ/पुस्तके खरेदीसाठी चर्चा करण्यात आली.
हिंगोली जिल्हयातील सर्व
ग्रंथप्रेमी, वाचकांनी मोठ्या प्रमाणात सभासद होऊन सहभाग नोंदवावा व वाचनाचा आनंद घ्यावा.
यासाठी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, नेहरु नगर, रिसाला नाका, हिंगोली (सपंर्क
क्र. 9403067267) येथे कार्यालयीन वेळेत संपर्क
साधावा.
हे ग्रंथ प्रदर्शन सर्वांसाठी
खुले असून जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, नेहरु नगर, रिसाला नाका, हिंगोली येथे
येऊन लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक यांनी केले आहे.
******
No comments:
Post a Comment