09 November, 2023

 

जिल्हा बाल संरक्षण कक्षाची आणि जिल्हा कृती दलाची आढावा बैठक संपन्न

 


 

हिंगोली (जिमाका), दि. 09 : बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम, 2015 च्या कलम 106 नुसार जिल्हा बाल संरक्षण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. आज उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा बाल संरक्षण कक्षाची व जिल्हा कृती दलाची कामकाज आढावा बैठक संपन्न झाली.

या बैठकीमध्ये जिल्हा बाल संरक्षण कक्षामार्फत राबविलेले विविध जनजागृती कार्यक्रम, जिल्ह्यात ग्राम बाल संरक्षण समितीमध्ये बाल मित्र निवडी बाबत कोविड काळात एक किंवा दोन्ही पालक गमावलेल्या बालकांच्या गृहभेटी, जिल्ह्यात चांबविलेल्या बाल विवाहाबाबत. काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांचे सामाजिक तपासणी अहवाल, पाठपुरावा, समुपदेशन, अनाथ बालकांना अनाथ प्रमाणपत्र, रस्त्यावर राहणाऱ्या बालकांच्या शोध मोहिमेबाबत तसेच जिल्ह्यातील कोविड-19 मुळे एक पालक किंवा दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची माहिती सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आर. आर. मगर यांनी दिली.

या बैठकीस सहायक पोलीस निरीक्षक विशाखा धुळे, उपमुख्याधिकारी उमेश हेंबाडे, बाल न्याय मंडळाच्या सदस्या डॉ. वर्षा कुरील, ॲड. सत्यशीला तांगडे, बाल न्याय मंडळाचे अशोक खुपसे, बाल कल्याण समितीचे अध्यक्ष सुधाकर इंगोले, सदस्य परसराम हेंबाडे, बाली भोसले, जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांचे प्रतिनिधी, जिल्हा माहिती अधिकारी यांचे प्रतिनिधी, वैद्यकीय अधिकारी यांचे प्रतिनिधी डॉ. प्रकाश जाधव, डॉ. स्नेहल नगरे, महिला आर्थिक विकास महामंडळाचे समन्वयक विलास जगताप, जिल्हा परिषद बाल कल्याणचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी विजय जगताप, पोलीस अधीक्षक यांचे प्रतिनिधी, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे, बाल संरक्षण अधिकारी (संस्थात्मक) गणेश मोरे, बाल संरक्षण अधिकारी (संस्थाबाह्य) जरीब खान पठाण, कायदा व परिविक्षा अधिकारी अॅड. अनुराधा पंडीत, सामाजिक कार्यकर्ता रामप्रसाद मुडे, क्षेत्रीय कार्यकर्ता अनिरुध्द घनसावंत उपस्थित होते.

****

No comments: