17 November, 2023


मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने पुरवठा योजनेंतर्गत

अर्ज करण्याचे आवाहन

हिंगोली (जिमाका), दि. 17 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टरच त्याची उपसाधने पुरवठा करणे या योजनेंतर्गत सन 2023-24 साठी अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, दर्गा रोड, रिसाला बाजार हिंगोली येथे दि.02 नोव्हेंबर, 2023 पासून विनामुल्य घेवून जावेत व परिपूर्ण भरलेले अर्ज दि. 01 डिसेंबर, 2023 पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावेत.

अर्जासोबत खालील नमुद कागदपत्रे जोडावीत : (1) बचतगट शासकीय कार्यालयाकडे नोंदणीकृत असल्याचे प्रमाणपत्र (2) गटात किमान 10 सदस्य असावेत (3) गटातील 80 % सदस्य अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील असावेत सोबत जात प्रमाणपत्र जोडावे (4) गटाचे खाते राष्ट्रीयकृत बँकेत असावे (5) बचतगटाचे पॅन कार्ड असावे (6) महाराष्ट्राचा रहिवाशी असल्याचा पुरावा, अधारकार्ड सोबत जोडावे.तसेच यापूर्वी बचतगटाने अथवा गटातील सदस्याने या योजनेचा  लाभ घेतला नसल्याचे शपथपत्र सादर करावेत.

तरी हिंगोली जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील नोंदणीकृत पात्र बचतगटांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

 

*******

No comments: