21 November, 2023

 

महारेशीम अभियानानिमित्त जिल्हा रेशीम कार्यालयाने तयार केलेल्या प्रचार रथाला जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ

 


 

हिंगोली, (जिमाका) दि. 21  :  महारेशीम अभियान-2024 अंतर्गत रेशीम शेतीच्या प्रचार आणि प्रसारासाठी जिल्हा रेशीम कार्यालयाने तयार केलेल्या प्रचार रथाला येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जिल्हाधिकारी  जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते  हिरवी झेंडी दाखवून महारेशीम अभियान-2024 चा शुभारंभ करण्यात आला.

संपूर्ण राज्यात शेतीला उत्तम जोडधंदा असलेल्या रेशीम शेतीचा प्रचार, प्रसार व्हावा यासाठी रेशीम संचालनालयाकडून दरवर्षी महारेशीम अभियानाचे आयोजन करण्यात येत आहे. अभियान कालावधीमध्ये गावोगावी जाऊन रेशीम शेतीविषयक प्रचार, प्रसार व जनजागृती करुन शेतकऱ्यांचा सहभाग वाढविण्यात येत आहे. यावर्षी महारेशीम अभियान दि. 20 नोव्हेंबर, 2023 ते दि. 20 डिसेंबर, 2023 या कालावधीत राबविण्यात येणार असून शेतकऱ्यांनी मोठ्या संख्यने नाव नोंदणी करुन पारंपारिक शेतीला उत्तम अशा जोडधंद्याची साथ देऊन स्वत:ची आर्थिक स्थिती बळकट करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी यावेळी केले.

यावेळी जिल्हा रेशीम विकास अधिकारी प्रमोद देशपांडे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शिवराज घोरपडे, वरिष्ठ तांत्रिक सहायक अशोक वडवळे, तांत्रिक सहायक नितीन लोलगे, डॉ. बालाजी भाकरे, रजनीश कुटे, रंगनाथ जांबूतकर, राजू रनविनर, केतन प्रधान, रमेश भवर, तानाजी परघेणे आदी उपस्थित होते.

******

No comments: