बेरोजगार सेवा सहकारी संस्था, लोकसेवा केंद्राचे
लेखा परिक्षण अहवाल 20 नोव्हेंबर पर्यंत सादर
करण्याचे आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 03 : जिल्हा कौशल्य
विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, हिंगोली या कार्यालयामार्फत दि. 11
डिसेंबर, 2015 च्या शासन निर्णयानुसार बेरोजगार सहकारी सेवा संस्था, लोकसेवा
केंद्रांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी हिंगोली जिल्ह्यातील बेरोजगार सेवा
सहकारी संस्थांना तीन लाख रुपयाच्या मर्यादेत विना निविदा कामे वाटप करण्याची
प्रक्रिया करण्यात येते.
कौशल्य विकास,
रोजगार व उद्योजकता कार्यालयाकडून जिल्ह्यातील बेरोजगार सहकारी सेवा संस्था,
लोकसेवा केंद्रांना आर्थिक वर्ष 2022-23 चे लेखा परिक्षण अहवाल दि. 10 नोव्हेंबर,
2023 सादर करण्याबाबत सूचित केले होते. या कालावधीला दि. 20 नोव्हेंबर, 2023
पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
हिंगोली
जिल्ह्यातील बेरोजगार सेवा सहकारी संस्था, लोकसेवा केंद्रांनी सन 2022-23 या
आर्थिक वर्षाचे लेखा परिक्षण अहवाल जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता
मार्गदर्शन केंद्र, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, हिंगोली येथे दि. 20
नोव्हेंबर, 2023 पर्यंत सादर करावेत, असे आवाहन सहायक आयुक्त, कौशल्य विकास,
रोजगार व उद्योजकता, हिंगोली यांनी केले आहे.
*****
No comments:
Post a Comment