कुणबी जातीच्या पहिल्या प्रमाणपत्राचे
जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते वितरण
हिंगोली
(जिमाका), दि. 02 : कुणबी जातीच्या पहिल्या प्रमाणपत्राचे
हिंगोली तालुक्यातील खंडाळा येथील सुनील रामचंद्र गायकवाड यांना जिल्हाधिकारी जितेंद्र
पापळकर यांच्या हस्ते आज वितरण करण्यात आले.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी खुशाल सिंह परदेशी, उपविभागीय
अधिकारी उमाकांत पारधी, उपजिल्हाधिकारी स्वप्निल मोरे, तहसीलदार नवनाथ वगवाड यांची उपस्थिती होती. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र
पापळकर यांनी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या निर्देशानुसार जिल्ह्यातील जुन्या
निजामकालीन नोंदीची तपासणी केली असता सन 1882 ते 1890 च्या कालावधीतील 3 हजार 30 नोंदी
सापडलेल्या आहेत. या सर्व नोंदीची स्कॅनिंग करून जिल्ह्यातील मराठा कुणबी समाजातील
नागरिकांसाठी जिल्ह्याच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
या नोंदीनुसार प्राप्त अर्जाची छाननी करून जात प्रमाणपत्र
तात्काळ उपलब्ध करून देण्याचे निर्देश सर्व उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले असून,
कुणबी नोंदी असलेल्या मराठा समाजातील बांधवांनी
कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज करून लाभ घेण्याचे आवाहनही यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले.
*****
No comments:
Post a Comment