सामाजिक न्याय
विभागातर्फे संविधान दिन मोठया उत्साहात साजरा
हिंगोली (जिमाका). दि. 27 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभांगाच्या
वतीने हिंगोली जिल्ह्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, हिंगोली येथे दिनांक
26 नोव्हेंबर, 2023 रोजी संविधान दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब
आंबेडकर यांचा पुतळा येथे सकाळी 7.00 वाजता
पुष्पहार अर्पण करुन संविधानाचे वाचन करण्यात आले. तसेच साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ
साठे पुतळा, संविधान कॉर्नर, महात्मा गांधी पुतळा, इंदिरा गांधी पुतळा, अग्रेसन पुतळा,
छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथेही राजू एडके, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली
यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
तद्नंतर संविधान
दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,हिंगोली येथे सकाळी 10.00 वाजता
मुख्य कार्यक्रमाचे अध्यक्ष समाज कल्याणचे सहायक आयुक्त राजू एडके हे होते. तर प्रमुख
पाहुणे संविधानाचे देणे या मराठी चित्रपटातील कलाकार सुर्यकांत माळगे, किशन
खिल्लारे, बाळू खिल्लारे, विस्तार अधिकारी मधुकर राऊत, आत्माराम वागतकर, अशोक इंगोले,
नामदेव रवणे, गुलाबराव सापनर आदी उपस्थित होते.
प्रारंभी मान्यवरांच्या
हस्ते महामानव क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहु महाराज,
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे
प्रास्ताविक समाज कल्याणचे सहायक आयुक्त राजू एडके यांनी केले तर सूत्रसंचालन
बार्टीचे जिल्हा प्रकल्प अधिकारी सिध्दार्थ गोवंदे तर आभार प्रदर्शन नवीन मागासवर्गीय
मुलींचे शासकीय वसतिगृहाच्या गृहपाल सुलोचना ढोणे यांनी केले.
यावेळी
"संविधानच देणं " हा मराठी चित्रपट दाखऊन संविधानाचे महत्व पटवून देण्यात
आले. हा चित्रपट पाहण्यासाठी 300 ते 350 जनसमुदाय उपस्थित होता.
तसेच हिंगोली
जिल्हयातील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग तसेच इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत
कार्यरत 08 शासकीय वसतिगृह, 01 शासकीय निवासीशाळा व 20-विजाभज आश्रमशाळा, 17 दिव्यांग
शाळा येथे मोठया उत्साहात संविधान दिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या
यशस्वीतेसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे
सर्व कर्मचारी वृंद यांनी सहकार्य केले.
*******
No comments:
Post a Comment