सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी 9 व 10 डिसेंबर रोजी
राज्यस्तरीय पंडित दीनदयाल उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे आयोजन
हिंगोली (जिमाका), दि. 22 : राज्याचे कौशल्य,
रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी राज्यातील जास्तीत
जास्त उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी व उद्योजकांना आवश्यक कुशल
मनुष्यबळ प्राप्त होण्यासाठी नामांकित उद्योजक, इंडस्ट्रीज समवेत नागपूर येथे दि.
9 व 10 डिसेंबर, 2023 रोजी नागपूर येथे राज्यस्तरीय पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार
मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या महारोजगार मेळाव्यात जास्तीत जास्त उमेदवारांना
रोजगार प्राप्त व्हावा हा प्रमुख उद्देश आहे.
या महारोजगार मेळाव्यात
महाराष्ट्रातील नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत. तसेच जिल्ह्यातील खाजगी आस्थापना,
उद्योग, व्यवसाय, कंपनी, फायनान्स, पतसंस्था, खाजगी बँक व उद्योजकांना आवश्यक कुशल
मनुष्यबळ प्राप्त होण्यासाठी अशा प्रकारच्या आस्थापनावरील रिक्त पदे https://rojgar.mahaswayam.gov.in या
संकेतस्थळावर अधिसूचित करुन या महारोजगार मेळाव्यामध्ये सहभाग नोंदवून नोकरी इच्छूक
उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन द्यावेत.
या महारोजगार मेळाव्यास
दहावी, बारावी, आयटीआय, डिप्लोमा, पदवी, पदवीधर या शैक्षणिक अर्हतेनुसार https://rojgar.mahaswayam.gov.in या
संकेतस्थळावर रिक्तपदे अधिसूचित केलेली आहेत. हिंगोली जिल्ह्यातील जास्तीत जास्त उमेदवारांनी
आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार पदांची खात्री करुन ऑनलाईन अर्ज करावेत व स्वत: मूळ कागदपत्रासह
जमनालाल बजाज भवन, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर येथे दि. 9 व 10 डिसेंबर,
2023 रोजी सकाळी 10.00 वाजता स्वखर्चाने उपस्थित राहावेत. याबाबत काही अडचण आल्यास
02456-224574 या दूरध्वनीवर किंवा 7972888970, 7385924589 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा,
असे आवाहन सहायक आयुक्त डॉ. राजपाल कोल्हे यांनी केले आहे.
****
No comments:
Post a Comment