मातंग व तत्सम समाजातील शेतजमीन असलेल्या व्यक्तीनी
शेतीपूरक व्यवसायासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्यासाठी माहिती
द्यावी
हिंगोली
(जिमाका), दि. 08 : मातंग समाज व तत्सम मांग, मातंग, मिनी मादीग, मादींग,
दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गारोडी, मादगी, मादिगा
या 12 पोटजातीतील ज्या ज्या लोकांच्या नावे शेतजमीन आहे. अशांची माहिती उपलब्ध करुन
घेऊन शासनास पाठविण्याचे आदेश आहेत. या अनुषंगाने मातंग समाजातील व तत्सम 12 पोटजातीतील
ज्यांच्या नावे शेतजमीन आहे. अशा व्यक्तींची, अर्जदाराची माहिती संकलित करुन या माहितीच्या
आधारे शासनाकडे महामंडळामार्फत शेतीपूरक, शेतीवर आधारित विविध व्यवसायासाठी अर्थसहाय्य
उपलब्ध करुन देण्यासाठी योजना प्रस्तावित करण्यासाठी माहितीची आवश्यकता आहे.
हिंगोली
जिल्ह्यातील मातंग समाजातील व तत्सम 12 पोटजातीतील ज्यांच्या नावे शेतजमीन आहे, अशा
मातंग समाजातील व तत्सम 12 पोटजातीतील जमीनधारकांनी शेतीचा सातबारा, जातीचा दाखला,
आधार कार्ड, पासपोर्ट आकाराचा फोटो या माहितीसह साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे
विकास महामंडळ (मर्या.) जिल्हा कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,
हिंगोली येथे दि. 20 नोव्हेंबर, 2023 पर्यंत कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन
जिल्हा व्यवस्थापक टी. आर शिंदे यांनी केले आहे.
******
No comments:
Post a Comment