विविध केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत निविष्ठांच्या अनुदानाचा
जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा
हिंगोली (जिमाका), दि. 22 : विविध केंद्र पुरस्कृत
योजनेंतर्गत राष्ट्रीय अन्न पोषण सुरक्षा-कडधान्य व राष्ट्रीय खाद्यतेल अभियान अंतर्गत
पिकांसाठी सन 2023-24 या रब्बी हंगामासाठी
एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन व एकात्मिक कीड व्यवस्थापन या बाबीसाठी पिक संरक्षण
औषधे, तणनाशके, जिप्सम, जैविक खते, जैविक कीड नियंत्रण या निविष्ठांसाठी शेतकऱ्यांना
किंमतीच्या 50 टक्के कमाल 500 रुपये प्रती हेक्टर याप्रमाणे कमाल 2 हेक्टर क्षेत्राच्या
मर्यादेत लाभ देय आहे.
सध्या रब्बी हंगामातील
पिकांवर कीड रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने शेतकऱ्यांना कृषि विद्यापीठाच्या
शिफारशीनुसार निविष्ठा खरेदी केल्यास राष्ट्रीय अन्न पोषण सुरक्षा-कडधान्य व राष्ट्रीय
खाद्यतेल अभियान सन 2023-24 च्या उत्पादन वाढीसाठी निविष्ठा पुरवठा घटक-प्रकल्पाबाहेरील
बाबीसाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार खालीलप्रमाणे अनुदान देय आहे.
सूक्ष्म मूलद्रव्ये,
जिप्सम, जैविक खते एकूण किंमतीच्या 50 टक्के कमाल 500 रुपये या मर्यादेत कमाल 2 हेक्टर
क्षेत्रासाठी देय आहे. तसेच पिक संरक्षण औषधे, तणनाशके, जैविक कीड नियंत्रण निविष्ठांना
किंमतीच्या 50 टक्के किंवा कमाल 500 रुपये हेक्टरी अनुदान देय आहे. एका शेतकऱ्याला
कमाल 2 हेक्टर मर्यादेत लाभ देय आहे. शेतकऱ्यांना अनुज्ञेय असलेले अनुदान शेतकऱ्यांच्या
खात्यावर थेट लाभ हस्तांतर पध्दतीने वर्ग करण्यात येणार आहे.
हिंगोली जिल्ह्यातील
शेतकऱ्यांनी वरील निकषानुसार निविष्ठा खरेदी करुन त्याची खरेदी पावती, सातबारा, आधारकार्ड
व बँक खात्यांचा तपशील इत्यादी कागदपत्रे संबंधित तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी
कार्यालयाकडे रब्बी हंगामासाठी दि. 30 डिसेंबर, 2023 पूर्वी सादर करावेत. या योजनेचा
लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन शिवराज घोरपडे, जिल्हा अधीक्षक कृषि
अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.
********
No comments:
Post a Comment