06 November, 2023

 

दिवाळी निमित्त महिला बचत गटाच्या उत्पादित मालाचे जिल्हास्तरीय विक्री प्रदर्शन

जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते 8 नोव्हेंबर रोजी उद्घाटन

                         

  हिंगोली (जिमाका), दि. 06 : येथील महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने दिवाळी निमित्त दिवाळी मेळावा म्हणून महिला बचत गटाच्या उत्पादित मालाचे जिल्हास्तरीय विक्री प्रदर्शन दि. 8 नोव्हेंबर ते 10 नोव्हेंबर, 2023 या कालावधीत रामलीला मैदानाजवळील महावीर भवन येथे आयोजित केले आहे. या जिल्हास्तरीय विक्री प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते दि. 8 नोव्हेंबर, 2023 रोजी दुपारी 12.00 वाजता होणार आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने हे राहणार आहेत. यावेळी विशेष निमंत्रित म्हणून आमदार संतोष बांगर, अमरावती विभागाचे विभागीय संसाधन व्यक्ती केशव पवार, नगर परिषदेचे मुख्याधिकारी अरविंद मुंडे, आयसीआयसीआय बँकेचे नांदेड विभागाचे व्यवस्थापक अनिल इंगोले, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शिवराज घोरपडे, जिल्हा नियोजन अधिकारी एस. एन. जाधव हे उपस्थित राहणार आहेत.

या महिला बचत गटाच्या विक्री प्रदर्शनाचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा समन्वय अधिकारी, महिला आर्थिक विकास महामंडळ, हिंगोली यांनी केले आहे.

 

*******

No comments: