20 November, 2023

 

बालगृहात बालक दिन उत्साहात साजरा

 

 

हिंगोली, (जिमाका) दि. 20  :  जिल्ह्यात सरस्वती मुलींचे बालगृह, निरीक्षणगृह, सावरकर नगर, हिंगोली आणि श्री स्वामी समर्थ बालगृह, खानापूर (चित्ता) ता.जि. हिंगोली येथे 14 नोंव्हेंबर रोजी बालक दिन मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला.

मा.बाल कल्याण समितीच्या वतीने बालकांच्या कलागुणांना चालना देण्यासाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या.  त्यामध्ये बालगृहातील दिपावली या विषयावरील निबंध स्पर्धा घेण्यात आली. तसेच बालकामध्ये भाषण कला अवगत होण्यासाठी ऐनवेळेवर दिलेल्या विषयावर दोन मिनिटे मत/विचार सादर करण्याची स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धांमध्ये बालकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला व आपले मत/ विचार मांडले.

जिल्हा बाल संरक्षण अधिकारो सरस्वती कोरडे यांनी बालकांना बालक दिनाच्या निमित्ताने बालकाचा जीवन जगण्याचा अधिकार, संरक्षणाचा अधिकार, सहभागाचा अधिकार व विकासाचा अधिकार या विषयी मागदर्शन केले. यावेळी केक कापून बालक दिन साजरा करण्यात आला. तसेच सरस्वती कोरडे यांनी उपस्थित बालकांना फळाचे वाटप केले.

यावेळी कार्यक्रमाला बाल कल्याण समितीचे अध्यक्ष सुधाकर इंगोले, सदस्य बाली भोसले, किरण करडेकर, संगीता दुबे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे व सरस्वती मुलीचे बालगृह व निरीक्षणागृहाचे शिक्षक शंकर घ्यार व काळजी वाहक वनिता पवार, श्री स्वामी समर्थ बालगृहाचे अधीक्षक रमेश पवार, सामाजिक कार्यकर्ता रामप्रसाद मुडे व चाईल्ड हेल्प लाईनचे समन्वयक संदीप कोल्हे व इतर चाईल्ड हेल्प लाईनचे कर्मचारी उपस्थित होते.

 

*****

No comments: