आंतरराष्ट्रीय
दत्तक महिनानिमित्त सेनगाव येथे जनजागृती
हिंगोली (जिमाका), दि. 23 : जिल्हा महिला व बालविकास अधिकारी आर.
आर. मगर यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांच्या
नियोजनानुसार आंतरराष्ट्रीय दत्तक महिना निमित्ताने हिंगोली जिल्ह्यात सेनगाव येथील
ग्रामीण रुग्णालय, बस स्थानक, आठवडी बाजारामध्ये दि. 22 नोव्हेंबर, 2023 रोजी माहिती
पत्रक लावून जनजागृती करण्यात आली.
यावेळी सेनगाव ग्रामीण रुग्णालयाचे
डॉ. विनय बगाटे, डॉ.सचिन राठोड, सेनगाव बस स्थानकाचे कर्मचारी, प्रवासी व सेनगाव परिसरातील
ग्रामस्थ उपस्थित होते.
नोव्हेंबर हा महिना आंतरराष्ट्रीय दत्तक
महिना म्हणून साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने जिल्हा बाल संरक्षण कक्षाकडून बालकासंदर्भात
आणि बालकांशी निगडीत विविध विषयावर कार्यक्रम घेण्यात येत आहेत. कोणतेही बालक परस्पर
दत्तक घेणे हा कायद्याने गुन्हा आहे. यासाठी कायदेशीर प्रक्रिया www.cara.wcd.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करुन इच्छूक
पालक बालकाला दत्तक घेऊ शकतात. तसेच जिल्ह्यातील कुमारी माता व विधवा मातेस नुकतेच
जन्मलेले पण नको असलेल्या बाळाचे सुखरुप समर्पण करण्याविषयी व बालकांच्या कायद्याविषयीची
माहिती संस्थाबाह्य बाल संरक्षण अधिकारी जरीबखान पठाण यांनी दिली. कनिष्ठ संरक्षण अधिकारी
नितेश मकासरे यांनी कौंटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम,2005 विषयी
माहिती दिली. राहूल सिरसाट यांनी बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम,
2015 व बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 आणि बाल संगोपन योजनेची माहिती दिली. बालकांसाठी
चाईल्ड हेल्पलाईन 1098 बाबतची माहिती संदीप कोल्हे यांनी दिली. राजरत्न पाईकराव यांनी
अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, हिंगोली येथे भेट देण्याचे
आवाहन करण्यात आले.
*****
No comments:
Post a Comment