अल्पसंख्यांक समाजातील शिक्षण घेणाऱ्या मुलींनी शासकीय
वस्तीगृहाताचा लाभ घ्यावा
हिंगोली (जिमाका), दि. 03 : वसमत येथे
उपलब्ध असलेल्या शासकीय अल्पसंख्यांक मुलींच्या वस्तीगृहामध्ये सन 2023-24 या
वर्षाकरिता प्रवेश देणे चालू आहे. या वस्तीगृहामध्ये वसमत व परिसरातील अल्पसंख्याक
समाजातील उच्च शिक्षण घेणाऱ्या पात्रता धारक सर्व गरजू मुलींसाठी 70 टक्के व इतर
समाजातील 30 टक्के प्रवेश देण्यासाठी प्रवेश प्रक्रिया चालू आहे.
या शासकीय
वस्तीगृहामध्ये प्रवेश घेतलेल्या अल्पसंख्यांक समाजातील मुलींसाठी शासनाने भोजन
भत्ता सुद्धा देऊ केलेले आहे. वसतिगृहातील प्रवेशासाठी व इतर माहितीसाठी संस्थेतील
गणित चित्रकला निदेशक डी. के. बुंदेले संपर्क क्र. 8421685623 यांच्याशी सकाळी
10.00 ते सांयकाळी 5.30 पर्यंत संपर्क साधून जास्तीत जास्त मुलींनी या योजनेचा लाभ
घ्यावा, असे आवाहन प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वसमत जि.हिंगोली यांनी केले
आहे.
*****
No comments:
Post a Comment