विकसित भारत संकल्प यात्रा
यशस्वी होण्यासाठी योग्य नियोजन करुन
शासनाच्या विविध
योजनांचा लाभ वंचित असलेल्या सर्व घटकापर्यंत पोहोचवावेत
-
कौस्तुभ गिरी
• विकसित भारत संकल्प यात्रा
ही मोहीम यशस्वी करण्यासाठी शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यंत
पोहोचवावेत- जिल्हाधिकारी श्री. पापळकर
- विकसित भारत संकल्प यात्रेस जिल्ह्यात आजपासून प्रारंभ
हिंगोली
(जिमाका), दि. 24 : केंद्र शासनाच्या फ्लॅगशिप
योजनांचे लाभ लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या
सहकार्याने हिंगोली जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
आजपासून या यात्रेला प्रारंभ होत आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी योग्य नियोजन
करुन विकसित भारत संकल्प यात्रा या मोहिमेच्या माध्यमातून लाभापासून वंचित
घटकापर्यंत शासनाच्या विविध योजनांचा लाभ पोहोचवावा, अशा सूचना केंद्रीय आरोग्य विभागाचे
अव्वर सचिव कौस्तुभ गिरी यांनी दिल्या.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात विकसित भारत संकल्प यात्रा
निमित्ताने आज आयोजित आढावा बैठकीत श्री. गिरी बोलत होते. बैठकीस अपर जिल्हाधिकारी
खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी दिलीप कच्छवे, उपजिल्हाधिकारी स्वप्नील
मोरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कैलाश शेळके,
उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) आत्माराम बोंद्रे, महिला व बाल विकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश
वाघ आदींची उपस्थिती होती.
यावेळी केंद्रीय आरोग्य विभागाचे सचिव कौस्तुभ गिरी मार्गदर्शन करतांना
म्हणाले की, केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा माहिती लाभार्थ्यांपर्यंत
पोहचवून त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी या विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन करण्यात
आले आहे. ही संकल्प यात्रा नगरपालिका क्षेत्र आणि जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायत
क्षेत्रात जाणार असल्याने प्रत्येक तालुकास्तर आणि ग्रामपंचायत स्तरावर समन्वय समिती
गठीत करण्यात यावी. तसेच समन्वय अधिकाऱ्याची
देखील नियुक्ती करण्यात यावी. जिल्ह्यात ही
यात्रा दि. 26 जानेवारी, 2026 पर्यंत राबविण्यात येणार असल्याने प्रत्येक दिवशी दोन
ग्रामपंचायती यानुसार यात्रेचे दैनंदिन वेळापत्रक तयार करुन योग्य नियोजन करावे. या यात्रेत केंद्र शासनाच्या फ्लॅगशिप योजनांचे
लाभ लक्ष्यित लाभार्थ्यापर्यंत पोहचविणे आणि विकसित भारत संकल्प यात्रेचे उद्दिष्ट
साध्य करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणानी योग्य कार्यवाही करावी. या यात्रेच्या माध्यमातून
जिल्ह्यातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहचण्याची संधी उपलब्ध झालेली आहे. त्यामुळे प्रत्येक
लाभार्थ्यांना केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनेचे लाभ देण्याचे देखील नियोजन सर्व
विभागांनी करावे. तसेच यात्रेच्या दरम्यान ग्रामपंचायत स्तरावर विविध कार्यक्रमाचे
किंवा लाभार्थ्यांना लाभ देण्यासंबंधी शिबीराचे आयोजन करण्यात यावे. तसेच केंद्र शासनाच्या
सूचनेनुसार संकल्पव यात्रेची माहिती, फोटो, व्हिडीओ इत्यादींची माहिती केंद्र शासनाच्या
पोर्टलवर अपलोड करावी असेही श्री. गिरी यांनी सूचना दिल्या.
जिल्हाधिकारी श्री. पापळकर म्हणाले की, केंद्र आणि राज्य शासनाच्या
सहकार्याने दि. 15 नोव्हेंबर, 2023 ते दि.26 जानेवारी, 2024 या कालावधीत विकसित भारत
संकल्प यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. हिंगोली जिल्ह्यात आज दि. 24 नोव्हेंबर,
2023 ते दि. 26 जानेवारी, 2024 या कालावधीत संकल्प यात्रा होणार आहे. केंद्रीय आरोग्य
विभागाचे सचिव कौस्तुभ गिरी यांच्या हस्ते आज या संकल्प यात्रेला सुरुवात होणार आहे.
जिल्ह्यातील पाच तालुक्यातील नगरपालिका क्षेत्र आणि सर्व 563 ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये
या यात्रेचे आयोजन करण्यात येणार आहे. या यात्रेच्या माध्यमातून ग्रामस्वराज्य अभियान
राबविले जाणार आहे. या विकसित भारत संकल्प यात्रा मोहिमेच्या माध्यमातून अद्यापपर्यंत ज्या योजनांचे लाभ लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यंत
पोहोचलेले नाहीत, अशा सर्व लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोहचविण्याच्या उद्देशाने विकसित
भारत संकल्प यात्रा ही देशव्यापी मोहीम केंद्र शासनाकडून राबविण्यात येत आहे. या यात्रेच्या
माध्यमातून केंद्र व राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची जनजागृती करत त्यांना
लाभ देण्यात येणार आहे. या यात्रेसाठी शासनाकडून विविध कल्याणकारी योजनाची सविस्तर
माहिती असलेले एलईडी चित्ररथाद्वारे जिल्ह्यातील नगरपालिका क्षेत्र आणि विविध ग्रामपंचायत
क्षेत्रामध्ये केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची व्यापक प्रचार-प्रसिद्धी केली
जाणार आहे. यात्रेची दैनंदिन माहिती, फोटो आणि व्हिडीओ इत्यादीं केंद्र शासनाच्या वेबपोर्टलवर
दररोज अपलोड करावी. तसेच स्थानिक पातळीवरील लोकप्रतिनिधी, लाभार्थी, व्यापक जनसहभाग
व जिल्हा समन्वयक यांच्या सहकार्याने ही मोहिम यशस्वी करण्यात यावी, अशा सूचनाही यावेळी
जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी दिल्या.
यावेळी सर्व तहसीलदार, सर्व गट विकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी,
नगर पालिकाचे मुख्याधिकारी यांच्यासह विविध विभागातील अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती
होती.
******
No comments:
Post a Comment