आंतरराष्ट्रीय दत्तक महिनानिमित्त जवळा,असोला व गोरेगाव येथे जनजागृती
हिंगोली (जिमाका), दि. 29 : जिल्हा महिला व बालविकास अधिकारी आर. आर. मगर यांच्या
मार्गदर्शनाखाली व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांच्या नियोजनानुसार
आंतरराष्ट्रीय दत्तक महिना निमित्ताने हिंगोली जिल्ह्यात औंढा नागनाथ तालुक्यातील प्राथमिक
आरोग्य केंद्र जवळा बाजार आशा वर्कर्स, जवळा बाजार पोलीस चौकी, मौजे असोला येथे व
सेनगाव तालुक्यातील गोरेगाव पोलीस स्टेशन, प्राथमिक आरोग्य केंद्र इत्यादी ठिकाणी जनजागृती
कार्यक्रम घेण्यात आले.
यावेळी गोरेगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र हुंडेकर,
जवळा पोलीस चौकी पोलीस उपनिरीक्षक पी. सी. जाधव, जवळा बाजार येथील आशा गट प्रवर्तक
मैना देवकत्ते व इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमात जिल्हा बाल संरक्षण कक्षाकडून बालकासंदर्भात आणि
बालकांशी निगडीत विविध विषयावर कार्यक्रम घेण्यात येत आहेत. कोणतेही बालक परस्पर
दत्तक घेणे हा कायद्याने गुन्हा आहे. यासाठी कायदेशीर प्रक्रिया www.cara.wcd.gov.in या संकेतस्थळावर
नोंदणी करुन इच्छूक पालक बालकाला दत्तक घेण्यात यावेत. जेणेकरुन दत्तक घेणाऱ्या
पालकांचे व दत्तक घेतलेल्या बालकांचे अधिकार अबाधित राहतील. याविषयीची माहिती तसेच
बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006, लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण 2012,
क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना, बाल कामगार प्रतिबंध कायदा
1986, बाल हक्क संहिता इत्यादी विषयाची सविस्तर माहिती जिल्हा बाल संरक्षण
कक्षाच्या कायदा तथा परिविक्षा अधिकारी ॲड. अनुराधा पंडित, सामाजिक कार्यकर्त्या
रेश्मा पठाण, रामप्रसाद मुडे यांनी दिली. बालकांसाठी चाईल्ड हेल्पलाईन 1098 बाबतची
माहिती हिंगोलीचे केस वर्कर तथागत इंगळे यांनी दिली. तसेच यावेळी अधिक माहितीसाठी
जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, हिंगोली येथे भेट देण्याचे आवाहन
करण्यात आले.
*****
No comments:
Post a Comment