आंतरराष्ट्रीय दत्तक महिनानिमित्त कळमनुरी येथे जनजागृती
हिंगोली (जिमाका), दि. 21 : जिल्हा महिला व बालविकास अधिकारी आर. आर. मगर यांच्या
मार्गदर्शनाखाली व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांच्या नियोजनानुसार
आंतरराष्ट्रीय दत्तक महिना निमित्ताने हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी येथील उपजिल्हा
रुग्णालय, पोलीस स्टेशन, बस स्थानकात दि. 16 नोव्हेंबर, 2023 रोजी माहिती पत्रक
लावून जनजागृती करण्यात आली.
यावेळी कळमनुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंढे, सहायक
पोलीस निरीक्षक विजय रामोड, वैद्यकीय अधिकारी डॉ. एस.एम. नरवाडे, आगार प्रमुख बिजय
बोरसे इत्यादी उपस्थित होते.
नोव्हेंबर हा महिना आंतरराष्ट्रीय दत्तक महिना म्हणून साजरा करण्यात
येत आहे. यानिमित्ताने जिल्हा बाल संरक्षण कक्षाकडून बालकासंदर्भात आणि बालकांशी
निगडीत विविध विषयावर कार्यक्रम घेण्यात येत आहेत. कोणतेही बालक परस्पर दत्तक घेणे
हा कायद्याने गुन्हा आहे. यासाठी कायदेशीर प्रक्रिया www.cara.wcd.gov.in या संकेतस्थळावर
नोंदणी करुन इच्छूक पालक बालकाला दत्तक घेऊ शकतो तसेच बालकांच्या कायद्याविषयी,
दत्तक प्रक्रियेविषयी संस्था बाह्य बाल संरक्षण अधिकारी जरीबखान पठाण यांनी माहिती
दिली. बालकांसाठी चाईल्ड हेल्पलाईन 1098 बाबतची माहिती संदीप कोल्हे यांनी दिली.
बालकांसाठी असलेल्या बाल संगोपन योजनेविषयीची माहिती राजरत्न पाईकराव यांनी दिली.
तसेच यावेळी अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, हिंगोली
येथे भेट देण्याचे आवाहन करण्यात आले.
*****
No comments:
Post a Comment