आंतरराष्ट्रीय दत्तक महिनानिमित्त वसमत येथे जनजागृती
हिंगोली (जिमाका), दि. 08 : जिल्हा महिला व बालविकास अधिकारी आर. आर. मगर यांच्या
मार्गदर्शनाखाली व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांच्या नियोजनानुसार
आंतरराष्ट्रीय दत्तक महिना निमित्ताने हिंगोली जिल्ह्यात दि. 07 नोव्हेंबर, 2023
रोजी उपजिल्हा रुग्णालय वसमत, स्त्री रुग्णालय वसमत, पोलीस स्टेशन वसमत (शहरी)
तसेच एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालय वसमत येथे माहिती पत्रक लावून जनजागृती
करण्यात आली.
यावेळी वसमत शहर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक पंढरीनाथ
बोधनापोड, पोलीस उपनिरीक्षक पिंगारे, कनिष्ठ संरक्षण अधिकारी जे. आर. राठोड,
संतोषी माता महिला मंडळाचे अध्यक्ष संतोष चव्हाण व महिला समुपदेशन केंद्राचे
समुपदेशक सय्यद अझरअली इत्यादी उपस्थित होते.
नोव्हेंबर हा महिना आंतरराष्ट्रीय दत्तक महिना म्हणून साजरा करण्यात
येत आहे. यानिमित्ताने जिल्हा बाल संरक्षण कक्षाकडून बालकासंदर्भात आणि बालकांशी
निगडीत विविध विषयावर कार्यक्रम घेण्यात येत आहेत. कोणतेही बालक परस्पर दत्तक घेणे
हा कायद्याने गुन्हा आहे. यासाठी कायदेशीर प्रक्रिया www.cara.wcd.gov.in या संकेतस्थळावर
नोंदणी करुन इच्छूक पालक बालकाला दत्तक घेऊ शकतो, अशी माहिती जिल्हा बाल सरंक्षण
कक्षाचे अधिकारी गणेश मोरे यांनी दिली. तसेच बालकांच्या कायद्याविषयी, दत्तक
प्रक्रियेविषयी माहिती दिली. बालकांसाठी चाईल्ड हेल्पलाईन 1098 बाबतची माहिती
संदीप कोल्हे यांनी दिली. बालकांसाठी असलेल्या बाल संगोपन योजनेविषयीची माहिती
राजरत्न पाईकराव यांनी दिली. तसेच यावेळी अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बालविकास
अधिकारी कार्यालय, हिंगोली येथे भेट देण्याचे आवाहन करण्यात आले.
*****
No comments:
Post a Comment