छत्रपती शिवाजी महाराज-सारथी जिल्हास्तरीय वसतिगृहे संकुल
योजनांतर्गत
खाजगी वसतिगृह चालविण्यासाठी नोंदणीकृत संस्थांनी अर्ज करावेत
हिंगोली (जिमाका), दि. 24 :
छत्रपती शाहू महाराज प्रशिक्षण व मानव विकास
संस्था (सारथी) पुणे मार्फत छत्रपती शिवाजी महाराज सारथी जिल्हास्तरीय वसतिगृहे
संकुल योजना अंतर्गत खाजगी नोंदणीकृत संस्थाकडून महाविद्यालयातील मुले-मुलींसाठीचे
वसतिगृह चालविण्यास अर्ज मागविण्यात येत आहेत. यासाठी अर्ज करणारी इच्छूक संस्था
ही मुंबई विश्वस्त कायदा, 1950 किंवा संस्था नोंदणी कायदा, 1860 अंतर्गत नोंदणीकृत
असणे आवश्यक आहे. तसेच अशा संस्थेचे किमान तीन वर्ष लेखा परिक्षण पूर्ण झालेले
असणे आवश्यक आहे. जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी सुसज्ज वसतिगृह असलेल्या खाजगी
नोंदणीकृत संस्थांना यामध्ये प्राधान्य देण्यात येईल.
संस्था निवडीसाठीचे पात्रता, निकष, अटी व शर्ती
या सारथी संस्थेच्या https://sarthimaharashtra.gov.in
या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहे. यासाठी परिपूर्ण अर्ज आवश्यक त्या
कागदपत्रासह उपव्यवस्थापकीय संचालक, सारथी विभागीय कार्यालय, शासकीय अध्यापक
महाविद्यालय सभागृह, पदमपुरा स्टेशन रोड, देवगिरी कॉलेजजवळ, छत्रपती संभाजीनगर
पिनकोड-431005 येथे कार्यालयीन वेळेत दि. 15 डिसेंबर, 2023 पर्यंत दाखल करावेत.
उशिराने प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही. अधिक माहितीसाठी श्रीमती पंकजा
देशमुख, संशोधन अधिकारी दूरध्वनी क्रमांक-0240-2990997 व divaurangabadsarthi@gmail.com
या ई-मेलवर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी हिंगोली तथा अध्यक्ष छत्रपती
शिवाजी महाराज-सारथी जिल्हास्तरीय वसतिगृहे संकुल योजना यांनी केले आहे.
**********
No comments:
Post a Comment