ग्रामीण भागातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना
लॅपटॉप खरेदी अर्थसहाय्य
ईश्वर चिठ्ठीद्वारे होणार 9 नोव्हेंबर रोजी लाभार्थ्यांची
निवड
·
पात्र लाभार्थ्यांनी निवडीच्या दिवशी
उपस्थित राहण्याचे आवाहन
हिंगोली
(जिमाका), दि. 06 : जिल्हा
परिषदेच्या सेस योजना सन 2023-24 मधून 20 टक्के मागासवर्गीय कल्याण निधीअंतर्गत
ग्रामीण भागातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना लॅपटॉप खरेदीसाठी अर्थसहाय्य पुरवणे
या योजनेसाठी लाभार्थ्याची निवड करावयाची आहे. लाभार्थी निवडीसाठी पंचायत समिती
स्तरावरुन अर्ज मागविण्यात आले होते. पात्र लाभार्थ्यांमधून ईश्वर चिठ्ठीद्वारे
लाभार्थ्यांची निवड करावयाची आहे. लाभार्थ्यांची निवड जिल्हा परिषदेच्या षटकोनी
सभागृहात दि. 9 नोव्हेंबर, 2023 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या उपस्थितीत
ईश्वर चिठ्ठीद्वारे करण्यात येणार आहे.
या योजनेसाठी पात्र
लाभार्थ्यांनी निवडीच्या दिवशी प्रत्यक्ष उपस्थित राहावे, असे आवाहन निवड समितीचे
अध्यक्ष तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, सह अध्यक्ष तथा
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, सदस्य सचिव तथा
जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजू एडके व निवड समितीचे सर्व सदस्य यांनी केले आहे.
******
No comments:
Post a Comment