स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अभियानांतर्गत
प्रधान मंत्री किसान
सन्मान योजनेच्या 11 व्या हप्त्याचे पंतप्रधानाच्या हस्ते वितरण
हिंगोली (जिमाका), दि. 27 : भारताच्या
75 व्या स्वातंत्र्य दिनाच्या अनुषंगाने सन 2022 मध्ये संपूर्ण भारतामध्ये दिनांक 15
ऑगस्ट, 2022 रोजी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. या
अभियानांतर्गत प्रधान मंत्री किसान सन्मान योजनेच्या 11 व्या हप्त्याचे वितरण भारताचे
मा.पंतप्रधान यांच्या हस्ते दिनांक 31 मे, 2022 रोजी होणार आहे.
प्रधान मंत्री किसान सन्मान योजना दि. 1 डिसेंबर,
2018 मध्ये सुरु कण्यात आली आहे. या योजनेचे हिंगोली जिल्ह्यात 2.16 लाख इतके
खातेदार आहेत. यापैकी सुमारे 75 हजार 536 खातेदारांना 10 हप्ते वितरीत करण्यात आले
आहेत. तर 1 लाख 24 हजार 664 लाभार्थ्यांना 9 हप्त्याचे वितरण करण्यात आले आहे.
जिल्ह्यामध्ये अपात्र आढळून आलेल्या लाभार्थ्याकडून अदा केलेली रक्कम वसूल करण्यात
येत आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शिवराज घोरपडे यांनी दिली आहे.
******
No comments:
Post a Comment