अधिपरिचारिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी राज्य महिला आयोग सज्ज
- राज्य महिला आयोगाच्या सदस्या ॲड. संगीता
चव्हाण
हिंगोली (जिमाका), दि. 20
: महिला अधिपरिचारिकांच्या
अडीअडचणी सोडविण्यासाठी राज्य महिला आयोग तुमच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे, असे
प्रतिपादन राज्य महिला आयोगाच्या सदस्या ॲड. संगीता चव्हाण केले.
येथील आरोग्य विभागाच्या
जिल्हा प्रशिक्षण केंद्राच्या सभागृहात डॉक्टर व अधिपरिचारिका यांच्याशी संवाद
साधताना त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी,
अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.मंगेश टेहरे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. गोपाल
कदम, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विठ्ठल शिंदे आदी उपस्थित होते.
यावेळी
बोलतांना ॲड. चव्हाण म्हणाल्या, कोरोनाच्या काळात आपण चांगले काम केले आहे. त्यामुळेच
लवकरात लवकर कोरोनावर मात करणारा महाराष्ट्र राज्य ठरला आहे. त्यामुळे डॉक्टर व अधिपरिचारिकांचे
अभिनंदन केले. तसेच अधिपरिचारिका व डॉक्टरांनी रुग्णालयात येणाऱ्या महिलांना आपल्या
माता भगिनी समजून चांगल्या प्रकारे सेवा द्यावेत. कर्मचाऱ्यांच्या व रुग्णांच्या आरोग्याच्या
दृष्टिकोनातून प्रसूती विभागात स्वच्छता ठेवावी. शौचालय वेळोवेळी स्वच्छ करावेत. रुग्णालयातील
महिला कर्मचाऱ्यांचे प्रश्न विशाखा समितीच्या माध्यमातून सोडवाव्यात अशा सूचना केल्या.
याप्रसंगी डॉक्टर, अधिपरिचारिका, कर्मचारी मोठ्या संख्येने
उपस्थित होते.
******
No comments:
Post a Comment