16 May, 2022

 

शिष्यवृत्ती अर्ज मंजुरीसाठी 31 मे पर्यंत मुदतवाढ

महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज मंजुरीसाठी सादर करावेत

 

            हिंगोली (जिमाका), दि. 16 : सन 2021-2022 या वर्षातील शिष्यवृत्ती अर्ज भरण्याचे व पात्र अर्जास मंजुरी देण्याचे कामकाज सद्यस्थितीत सुरु आहे. अर्ज नोंदणीकृत करणे व पात्र अर्जास मंजुरी देण्याबाबतची कार्यवाही करण्यासाठी शासनाकडून वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आलेली आहे. अंतिम मुदत 31 मे, 2022 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील सर्व शासन मान्यता प्राप्त अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी विहित मुदतीत पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज मंजुरीसाठी सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

            महाडीबीटी पोर्टलवरील सन 2021-2022 या वर्षासाठीचे अनुसूचित जाती, विभाभज, विमाप्र, तसेच इमाव या प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजनेचे मोठ्या प्रमाणात महाविद्यालय स्तरावर प्रलंबित दिसून येत आहेत. महाविद्यालय स्तरावरील प्रलंबित अर्ज महाविद्यालयांनी मंजूर न केल्याने सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयास मंजुरीची कार्यवाही करता येत नाही. शासनाकडून विहित मुदतीत अर्ज नोंदणी करणे व मंजुरी देण्याची कार्यवाही होणार असल्याने मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्ती योजनेपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेणे आवश्यक आहे.

            ज्या महाविद्यालयाकडून महाडीबीटीवर निश्चित करुन देण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार कार्यवाही होणार नाही अशा महाविद्यालयाचे प्राचार्यावर जबाबदारी निश्चित करुन नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल. त्यामुळे विहित मुदतीत पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज मंजुरीसाठी सादर करावेत, असे आवाहन शिवानंद मिनगीरे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली यांनी केले आहे.

*****

No comments: