हिंगोली जिल्हा
न्यायालयामध्ये राष्ट्रीय लोकअदालतीचे
जिल्हा न्यायाधीश एन. बी.
शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन
- राष्ट्रीय
लोकअदालतीमध्ये 68 प्रकरणे निकाली
हिंगोली (जिमाका), दि. 09 : येथील जिल्हा न्यायालय व त्याअंतर्गत येणाऱ्या विविध न्यायालयात तालुका
विधी सेवा समिती व हिंगोली वकील संघाच्या वतीने दि. 7 मे, 2022 रोजी जिल्हा
न्यायालय परिसरात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या राष्ट्रीय
लोक अदालतीचे उद्घाटन जिल्हा न्यायाधीश-1 एन. बी. शिंदे यांच्या हस्ते झाले. या
उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिंगोली वकील संघाचे अध्यक्ष ॲड. मतीन पठाण
हे होते. तर प्रमख पाहुणे बार कौन्सिल ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष एस. एस. देशमुख, जिल्हा
न्यायाधीश-2 पी. व्ही. बुलबुले, जिल्हा न्यायाधीश-3 के. जी. पालदेवार, दिवाणी
न्यायाधीश एच. जे. शेंडे, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व्ही. व्ही. निवघेकर, व्ही.
व्ही. जोशी, आय.ए.वाय.ए.खान तसेच वकील संघाचे उपाध्यक्ष डी. बी. खंदारे हे होते.
यावेळी उद्घाटनपर भाषणात जिल्हा न्यायाधीश एन. बी. शिंदे व बार
कौन्सिल ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष एस. ए. देशमुख यांनी जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडी
आधारे मिटवावेत, असे आवाहन केले. तर वकील संघाचे अध्यक्ष ॲड.मतीन पठाण यांनी
जास्तीत जास्त प्रकरणे मिटवावेत, असे आवाहन वकीलांना व पक्षकारांना केले.
या कार्यक्रमास वकील संघाचे सर्व सदस्य, बँकेचे अधिकारी,
न्यायालयीन कर्मचारी व पक्षकार हजर होते. या उद्घाटन कार्यक्रमाचे संचालन वकील
संघाचे उपाध्यक्ष ॲड. डी. बी. खंदारे यांनी केले.
या लोकअदालतीमध्ये भूसंपादन व मोटार अपघात नुकसान भरपाई प्रकरणे,
तडजोडयुक्त फौजदारी प्रकरणे, दिवाणी प्रकरणे, वैवाहिक, कौटुंबिक वाद प्रकरणे,
पराक्रम्य अभिलेख अपराध नियम 138 खालील प्रकरणे, दाखल पूर्व प्रकरणे इत्यादी 1326 प्रलंबित प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आले
होते. त्यापैकी 67 प्रकरणे निकाली निघाली आहेत. तसेच बँका व एमएसइडी कंपन्यांची 914
वादपूर्व प्रकरणे ठेवण्यात आलेली होती. यापैकी 01 प्रकरण निकाली निघाले आहे.
प्रलंबित व वादपूर्व प्रकरणात 84 लाख 35 हजार 428 रुपये एवढी रक्कम तडजोडीआधारे
वसूल झाली आहे.
या राष्ट्रीय लोकन्यायालयात मोठ्या प्रमाणात पक्षकार तसेच हिंगोली
वकील संघाचे सदस्य व न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते.
*****
No comments:
Post a Comment