19 May, 2022

 

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचे अर्ज 31 मे पर्यंत भरावेत

 

हिंगोली (जिमाका), दि. 19 : प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळमनुरी या प्रकल्पाच्या कार्यक्षेत्राअंतर्गत परभणी व हिंगोली या जिल्ह्यांचा समावेश होत असून सन 2021-22 या शैक्षणिक वर्षातील महाविद्यालयात प्रवेशित व पात्र विद्यार्थ्यानी आदिवासी विकास विभागाअंतर्गत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्ती या मंजूर करण्यात येते. त्याअनुषंगाने अनुसूचित जमातीच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचे ऑनलाईन अर्ज https://mahadbtmahiti.gov.in  या संकेतस्थळावर दिनांक 31 मे 2022 पर्यंत भरावेत, असे आवाहन प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळमनुरी यांनी केले आहे.

******

No comments: