खेलो
इंडिया राज्य निपुणता केंद्राअंतर्गत शुटींग, सायकलींग व ॲथलेटिक्स खेळाच्या
सुधारित निवड
चाचणीसाठी 15 जून पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 30
: आंतरराष्ट्रीय खेळाडू
निर्माण करण्यासाठी राज्य व केंद्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने शिवछत्रपती क्रीडा
संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे येथे ॲथलेटिक्स, शुटींग व सायकलींग या तीन
खेळांचे राज्य निपुणता केंद्र ( खेलो इंडिया स्टेट एक्सलन्स सेंटर) कार्यान्वित
करण्यात आले आहे.
खेलो
इंडिया राज्य निपुणता केंद्राअंतर्गत शुटींग, सायकलींग व ॲथलेटिक्स खेळाच्या सुधारित
निवड चाचणी दि. 21 जून ते 22 जून, 2022 या कालावधीत घेण्यात येणार आहेत. त्यासाठी
खेळाडूंचे अर्ज मागविण्यात येत आहेत. खेलो इंडिया राज्य निपुणता केंद्राअंतर्गत
ॲथेलेटिक्स-18, सायकलींग-14, शुटींग-24 खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे. वरील
संबंधित खेळाबाबतची खेळाडूंची चाचणी तंत्र समितीमार्फत घेऊन गुणानुक्रमे खेळ
बाबीमध्ये निश्चित केली जाणार आहे.
सायकलींग
व ॲथलेटिक्स खेळाचे राज्यस्तरावर प्राविण्य प्राप्त किंवा राष्ट्रीय स्तरावर सहभाग
, प्राविण्य प्राप्त खेळाडूच निवड चाचणीसाठी पात्र असतील. खेलो इंडिया राज्य
निपुणता केंद्राअंतर्गत प्रवेशासाठी दर्जात्मक खेळाडूंच्या निवड चाचणीसाठी
परिशिष्ट-अ नुसार मानके निश्चित केलेली आहेत. खेळाडूंना दि. 15 जून, 2022 पर्यंत
परिशिष्ट-ब नुसार माहिती अर्ज kiscepune@gmail.com
या ई-मेलवर पाठवावेत.
शिवछत्रपती
क्रीडा संकुल, म्हाळूंगे-बालेवाडी, पुणे येथे आवश्यकतेनुसार फक्त खेळाडूंची निवास
व्यवस्था करण्यात येणार असून प्रवास व भोजन खर्च स्वखर्चाने करण्यात यावा. चाचणीस
येताना खेळाडूंनी राज्य, राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा प्राविण्य प्रमाणपत्रांची व
शैक्षणिक कागदपत्रांची छायांकित प्रत व मूळ प्रत सोबत आणावी. चाचणीस येतांना
खेळाडूंनी जन्मतारखेची नोंद असलेल्या शाळेच्या जनरल रजिस्टरची छायांकित प्रत सोबत
आणावी.
शिवछत्रपती
क्रीडा संकुल, म्हाळूंगे-बालेवाडी, पुणे येथील राज्य निपुणता केंद्रात ( खेलो
इंडिया स्टेट एक्सलन्स सेंटर) प्रशिक्षण घेण्यासाठी सुधारित दि. 21 जून ते 22 जून,
2022 या कालावधीत होणाऱ्या निवड चाचणीसाठी वरील अटी व शर्तींची पूर्तता करणाऱ्या
खेळाडूंनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी,
हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
******
No comments:
Post a Comment