रास्तभाव दुकानातील धान्य वितरणाच्या परिमाणातील बदलानुसार
धान्य उपलब्ध करुन घेण्याचे आवाहन
हिंगोली,दि.13: प्रधानमंत्री
गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत लक्ष्यनिर्धारीत सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र
लाभार्थ्यांसाठी माहे मे, 2022 ते सप्टेंबर, 2022 करीता राष्ट्रीय अन्न सुरक्षा
योजनेंतर्गत अनुज्ञेय असलेल्या अन्नधान्याव्यतिरिक्त प्रतिसदस्य प्रतिमहा 05 किलो
अन्नधान्य मोफत वितरीत करण्यात येत आहे.
सदर योजनेंतर्गत यापूर्वी अंत्योदय
अन्न योजनेत प्रतिसदस्य गहू-03 किलो व तांदुळ-02 (एकूण-05किलो) वितरीत करण्यात येत
होते. तसेच प्राधान्य कुटूंब लाभार्थी योजनेत प्रतिसदस्य गहू-03 किलो व तांदुळ-02
किलो (एकूण-05 किलो) वितरीत करण्यात येत होते.
शासनामार्फत माहे मे, 2022 ते
सप्टेंबर 2022 या कालावधीत धान्य वितरणाच्या परिमाणात बदल केलेला असून तो पुढील
प्रमाणे आहे. अंत्योदय अन्न योजनेत प्रतिसदस्य गहू-02 किलो व तांदुळ-03 किलो
(एकूण-05 किलो) वितरीत करण्यात येणार आहे. तसेच प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेत
प्रतिसदस्य गहु-01 किलो व तांदुळ-04 किलो (एकूण-05 किलो) वितरीत करण्यात येणार
आहे. याची सर्व पात्र लाभार्थ्यांनी नोंद घेऊन त्या प्रमाणात संबंधीत रास्तभाव
दुकानांमधुन या सुधारीत धान्याचे परिमाणानुसार धान्य उपलब्ध करुन घेण्यात यावे,
असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी, प्रविणकुमार धरमकर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये
केले आहे.
****
No comments:
Post a Comment