पालकमंत्र्यांच्या जनता दरबारास उत्स्फूर्त प्रतिसाद
जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी
शासन कटिबध्द
- पालकमंत्री प्रा.
वर्षाताई गायकवाड
हिंगोली, (जिमाका) दि. 02 : जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन कटिबध्द
असून त्यासाठीच जनता दरबारचे आयोजन करण्यात आले आहे, असे प्रतिपादन राज्याच्या शिक्षण
मंत्री तथा पालकमंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड
यांनी केले.
येथील शासकीय विश्रामगृहात
पालकमंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड यांच्या
उपस्थितीत जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रंगी त्या बोलत होत्या. यावेळी
माजी आमदार संतोष टारफे, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधीक्षक राकेश कलासागर
यांची उपस्थिती होती.
पालकमंत्री प्रा. गायकवाड
पुढे म्हणाल्या, जनतेचे प्रश्न वेळीच सोडविण्यासाठी जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले असून या जनता दरबारात
सर्व अधिकाऱ्यांना बोलावण्यात येणार आहे. यामुळे जतनेचे प्रश्न वेळीच सोडविण्यास मदत
होणार आहे. त्यामुळे जनता दरबार घेऊन जनतेचे प्रश्न सोडविण्यात येतील, असे सांगितले.
या जनता दरबारात नागरिकांनी
आपल्या विविध अडीअडचणी पालकमंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड यांच्यासमोर मांडल्या. तसेच
अनेकांनी आपल्या मागण्यांचे निवदेन दिले. या निवेदनाचा स्वीकार करुन त्यांच्या समस्यांचे
निराकरण करण्याचे आश्वासन पालकमंत्री प्रा. गायकवाड यांनी दिले. या जनता दरबारमध्ये स्थानिक पातळीवरील विषय तातडीने
सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासनाला सूचना देण्यात आल्या. तर राज्य पातळीवरील विषयाबाबत
पाठपुरावा करुन आपल्या प्रश्नाची सोडवणूक करण्यात येईल, असे सांगितले.
या जनता दरबार कार्यक्रमास
जनतेचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला असून यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
****
No comments:
Post a Comment