वीज पडून
होणारी जिवित हानी टाळण्यासाठी ‘ दामिनी ’ ॲपचा वापर करावा
हिंगोली (जिमाका), दि. 27 : मान्सून
कालावधीत वीज पडून होणारी जिवित हानी टाळण्यासाठी भारत सरकार हवामान विभागाने ‘ दामिनी
’ ॲप तयार केले आहे. हे ॲप गुगल प्ले स्टोरवर उपलब्ध आहे.
हिंगोली जिल्ह्यात सुरक्षात्मक उपाययोजना म्हणून
आपल्या अधिनस्त तालुक्यातील सर्व शासकीय यंत्रणा, अधिकारी, कर्मचारी, नागरिक,
क्षेत्रीय अधिकारी, मंडळ अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी, तलाठी, कृषि पर्यवेक्षक,
सरपंच , ग्रामसेवक, पोलीस पाटील, कृषिसेवक, कोतवाल, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका,
आरोग्य सेवक, ग्रामपंचायत डाटा एंट्री ऑपरेटर यांना हे ॲप डाऊनलोड करुन वापर
करण्याबाबत प्रवृत्त करावे.
‘ दामिनी ’ हे ॲप जीपीएस लोकेशनने काम करीत असून
वीज पडण्याच्या 15 मिनिटापूर्वी ॲपमध्ये स्थिती दर्शविण्यात येते, अशा वेळी
सुरक्षित स्थळी जावे आणि झाडाचा आश्रय घेऊ नये याबाबत सर्वांना निर्देशित करण्यात
यावे. तसेच गावातील नागरिकांनी हा ॲप डाऊनलोड करण्याबाबत सूचना निर्गमित कराव्यात.
यासाठी प्रेसनोटद्वारे प्रसिध्दी देणे, ग्रामस्तरावरील अधिकारी, कर्मचारी तसेच संबंधिताच्या
बैठका घेणे, गावात दवंडी देणे इत्यादी उपाययोजना करण्यात याव्यात आणि केलेल्या
कार्यवाहीचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा.
ग्रामस्तरावरील आपले अधिनस्त शासकीय अधिकारी,
कर्मचारी यांच्यामार्फत या ॲपमध्ये प्राप्त होणाऱ्या विजेच्या अलर्ट नुसार आवश्यक
पूर्वसूचना गावातील सर्व नागरिकांना पोचवण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करण्याबाबत
संबंधितांना निर्देशित करावेत, अशा सूचना सर्व संबंधित यंत्रणेला जिल्हाधिकारी
जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.
******
No comments:
Post a Comment