परदेशात शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतलेल्या
विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे
आवाहन
हिंगोली
(जिमाका) दि.20 : अनुसूचित जमातीच्या दहा विद्यार्थ्यांना पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे परदेशात शिक्षण
घेण्यासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचा लाभ मिळण्यासाठी आदिवासी विभागाकडे दिनांक 10 जून,
2022 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास विभाग,
कळमनुरी यांनी केले आहे.
परदेश
शिष्यवृत्तीसाठीच्या पात्रतेबाबतच्या अटी व शर्ती, विहित नमुन्यातील अर्ज प्रकल्प अधिकारी,
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळमनुरी येथे उपलब्ध आहेत.
000000
No comments:
Post a Comment