19 May, 2022

 



सामाजिक न्याय विभागाच्या महिला वसतिगृहास

महिला आयोगाच्या सदस्या ॲड. संगीता चव्हाण यांची भेट

 

            हिंगोली (जिमाका), दि. 19 : येथील आदर्श कॉलेज परिसरात असलेल्या सामाजिक न्याय विभागाच्या महिला वसतिगृहास महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्या ॲड. संगीता चव्हाण यांनी भेट देऊन पाहणी केली.

यावेळी त्यांनी वसतिगृहातील कार्यालयाची, मुलींच्या जेवणाची व किचनची पाहणी करुन तेथील वसतिगृहातील भरलेल्या व रिक्त पदांची माहिती घेतली.

याप्रसंगी ॲड. चव्हाण यांनी तेथील गृहपालांना वसतिगृहातील  मुलींसाठी फॅनची सोय करावी, त्यांना उत्कृष्ट प्रकारचे जेवण, पिण्यासाठी स्वच्छ पाणी उपलब्ध करुन देण्याच्या सूचना केल्या. तसेच त्यांना निर्वाह भत्ता देण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या. तसेच त्यांनी वसतिगृहातील मुलींशी आस्थेवाईकपणे संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व त्या अडचणी प्राधान्याने सोडविण्यात येतील, असे सांगितले.

याप्रसंगी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विठ्ठल शिंदे, मंगला कांबळे, रेखा देवकते, अशोक वानखेडे यांची उपस्थिती होती.

********

No comments: